Mahabreaking

[breaking_news]

strike over various demands: SBI अधिकारी-कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप; मेहकरात जोरदार निदर्शने

strike over various demands:  SBI अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ११ सप्टेंबर रोजी बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद ठेवून संप केला. यामुळे बँकांच्या प्रवेशद्वारावर संपाबाबतचे फलक लावण्यात आले होते. परिणामी बँकांचे नियमित कामकाज ठप्प झाले.

strike

  ‘पाच दिवसांचा बँकिंग आठवडा लागू करा’; SBI कर्मचाऱ्यांचा संप, ग्राहकांची कामे खोळंबली

रमेश खंडागळे

बिबी : SBI अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ११ सप्टेंबर रोजी बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद ठेवून संप केला. यामुळे बँकांच्या प्रवेशद्वारावर संपाबाबतचे फलक लावण्यात आले होते. परिणामी बँकांचे नियमित कामकाज ठप्प झाले.

पाच दिवसांचा बँकिंग आठवडा लागू करावा, न्याय्य व भेदभावरहित कामावर आधारित प्रोत्साहन भत्ता (PLI) लागू करावा, तसेच बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांची तातडीने पूर्तता करावी, या मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU)च्या देशव्यापी आवाहनानुसार मेहकर येथे UFBU बुलडाणा जिल्हा युनिटच्या वतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.

या आंदोलनात   शामराव यसनसुरे,   पांडुरंग इंगळे,   अजिंक्य देशमुख,   चेतन तुपकर,   राजू निकम,   सागर कव्हळे,   जेजेराम जगताप,   शीतल पाचपवार,   शीतल बीडे,   सुरेंद्र डहाळे,   रविंद्र सुनाट,   अमोल खोडके,   समाधान वेव्हल,   रुपेश राजगुरू,   श्रेयस बाजड,   मनोज बोरे,   विकास मगर,   अभय इंगळे,   ज्ञानेश्वर लिंगायत,   सागर उताणे यांच्यासह UFBU अंतर्गत विविध बँक संघटनांचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ‘पाच दिवसांचा बँकिंग आठवडा लागू करा’, ‘न्याय्य व भेदभावरहित PLI लागू करा’, ‘बँकांमध्ये पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करा’, ‘NPS व पेन्शनसंदर्भातील प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवा’ यांसह विविध न्याय्य मागण्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

दरम्यान, बँका बंद असल्यामुळे अनेक नागरिकांची बँकिंगविषयक कामे खोळंबली. खातेदार व ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागला. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top