Mahabreaking

[breaking_news]

illegal sand transportation :रेतीच्या चोरट्या वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; चार टिप्पर जप्त

illegal sand transportation : जिल्ह्यात विनापरवाना व अवैधरित्या गौण खनिज अर्थात रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीवर लक्ष केंद्रित केले असून, शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत चार टिप्पर पकडले. या कारवाईत चार वाहनांसह एकूण १४ ब्रास रेती असा तब्बल १ कोटी १० लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

illegal sand

अवैध रेती वाहतुकीला लगाम! चार टिप्परसह तब्बल १ कोटी १० लाखांचा मुद्देमाल जप्त

गजानन तिडके

देऊळगाव राजा : जिल्ह्यात विनापरवाना व अवैधरित्या गौण खनिज अर्थात रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीवर लक्ष केंद्रित केले असून, शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत चार टिप्पर पकडले. या कारवाईत चार वाहनांसह एकूण १४ ब्रास रेती असा तब्बल १ कोटी १० लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्ह्यात गौण खनिजाची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने स्वतंत्र पथके तयार करून अवैध रेती वाहतुकीवर नजर ठेवण्यास सुरुवात केली होती.

दरम्यान, दि. ११ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारायणखेड शिवारातून काही व्यक्ती त्यांच्या ताब्यातील टिप्परमधून विनापरवाना रेतीची चोरटी वाहतूक करीत आहेत. या माहितीची खातरजमा करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देऊळगाव राजा ते चिखली रोडवरील अंढेरा फाटा येथे सापळा रचला.

पोलिसांनी अंढेरा फाट्यावर रोड नाकाबंदी केली असता, संशयित टिप्पर येताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना थांबवून तपासणी केली असता, संबंधित टिप्परमधून विनापरवाना व अवैधरित्या गौण खनिज रेतीची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी पोलिसांनी चार टिप्पर चालकांना ताब्यात घेतले.

पकडण्यात आलेले आरोपी

या कारवाईत रविंद्र साहेबराव इंगळे (वय ३१, रा. भानखेड, ता. चिखली), विष्णु उत्तम इंगळे (वय ४०, रा. भानखेड, ता. चिखली), आतिष जयवंता मादनकर (वय ४२, रा. भानखेड, ता. चिखली) आणि प्रसाद पंडीत मुरडकर (वय २५, रा. भानखेड, ता. चिखली) यांना पकडण्यात आले.

चार टिप्परसह १४ ब्रास रेती जप्त

पोलिसांनी केलेल्या कारवाईत   टिप्पर क्रमांक MH-28-B-8952 — अंदाजे किंमत ३० लाख रुपये, टिप्पर क्रमांक MH-28-BB-7299 — अंदाजे किंमत २० लाख रुपये ,            टिप्पर क्रमांक MH-28-AB-7509 — अंदाजे किंमत ३० लाख रुपये, टिप्पर क्रमांक MH-28-AB-7614 — अंदाजे किंमत ३० लाख रुपये, १४ ब्रास रेती — अंदाजे किंमत ८४ हजार रुपये असा चार टिप्पर व रेती मिळून एकूण १ कोटी १० लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड यांच्या तक्रारीवरून अंढेरा पोलीस ठाण्यात संबंधित चार आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) तसेच गौण खनिज अधिनियमातील कलम २१ (१), २१ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अंढेरा पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.

पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड तसेच खामगावचे अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक यशोदा कणसे, पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड, पोलीस हेड कॉन्स्टेबल शरदचंद्र गिरी, जगदेव टेकाळे, पुरुषोत्तम आघाव, युवराज राठोड, विजय वारुळे, तसेच पोलीस कॉन्स्टेबल अमोल अंभोरे, मंगेश सनगाळे, अमोल वनारे, मनोज खरडे आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल पूजा जाधव यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top