Save the school : जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळा बंद करण्याच्या धोरणाविरोधात बुलढाण्यात ‘शाळा वाचवा कृती समिती’ची निर्णायक बैठक पार पडली. बैठकीत शासनाच्या धोरणांवर तीव्र आक्षेप नोंदवत लवकरच राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

सरकारी शाळा बंदीविरोधात कृती समिती आक्रमक; सरकारला सतीश पवारांचा थेट इशारा
बुलढाणा : जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळा बंद करण्याच्या धोरणाविरोधात बुलढाण्यात ‘शाळा वाचवा कृती समिती’ची निर्णायक बैठक पार पडली. बैठकीत शासनाच्या धोरणांवर तीव्र आक्षेप नोंदवत लवकरच राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
बैठकीत बोलताना सतीश पवार यांनी सरकारवर थेट हल्ला चढवत, “गरिब व बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आधार असलेल्या जिल्हा परिषद शाळा जाणीवपूर्वक दुर्बल केल्या जात आहेत,” असा आरोप केला.
पवार यांनी नमूद केले की, भारतीय संविधानाच्या Article 21A of the Constitution of India नुसार ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला शिक्षणाचा मूलभूत अधिकार आहे. तसेच Right of Children to Free and Compulsory Education Act, 2009 (आरटीई) कायद्यानुसार मोफत व सक्तीचे शिक्षण देणे बंधनकारक आहे.
“सरकारी शाळा बंद करणे म्हणजे गरिबांच्या शिक्षणावर घाला घालणे होय. हा कपटी डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
सरकारवर गंभीर आरोप
सरकारने नियोजनबद्ध पद्धतीने काही शाळा बंद केल्या असून आगामी काळात आणखी शाळा बंद करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप कृती समितीकडून करण्यात आला. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या शाळांच्या कोट्यवधींच्या जमिनी खासगीकरणाच्या दिशेने वळवल्या जात असल्याचा आरोपही बैठकीत करण्यात आला.
राज्य शासनाच्या धोरणाला आव्हान देण्यासाठी Bombay High Court, Nagpur खंडपीठ येथे जनहित याचिका दाखल करण्याची घोषणा सतीश पवार यांनी केली.
ठरावांच्या मागण्या
बैठकीत एकमताने पुढील मागण्या मंजूर करण्यात आल्या :
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा.
प्रत्येक सरकारी शाळेत सीबीएससी अभ्यासक्रम लागू करावा.
सर्व शाळांना आधुनिक भौतिक सुविधा द्याव्यात.
शिक्षकांसाठीची टीईटी अट रद्द करावी.
सुविधांअभावी संघर्ष करणाऱ्या शाळांना तातडीने निधी द्यावा.
कर्तव्यदक्ष शिक्षकांना प्रोत्साहन व कामचुकारांवर कारवाई करावी.
कोअर समितीचे गठन
यावेळी ‘शाळा वाचवा कृती समिती’ची कोअर समिती गठीत करण्यात आली. कमलाकर काकडे, उद्धव मुळे, अर्जुन खरात, प्रा. कडबा पैठणे, प्रा. जयकुमार गवई, समाधान झीने, चंद्रकांत धुरंदर, मिलिंद जाधव, सुरेश जाधव, गुलाबराव गवई, जितेंद्र खंडेराव, प्रा. अमर चव्हाण, राहुल शिंगारे, विशाल साळवे, विजय पवार, राजू बनसोडे, विलास खंडेराव, मुकुंदा हेलोडे, यशवंत खंडेराव, भारत खंडेराव, अमोल इंगळे, एकनाथ खंडेराव, पंजाबराव गवई, अॅड. संदीप जाधव, रोशन शिखारे, शेषराव मोरे, सुनील खंडेराव, समाधान गवई, मोहन गवई, गौतम वानखेडे, विष्णू खंडेराव, भीमराव खंडेराव, सय्यद जे.बी., महेंद्र गवई, सुनील गवई, शैलेश गवई आदींचा समावेश आहे.
जिल्ह्यात उद्या पाचवी-आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा; २८ हजारांहून अधिक विद्यार्थी बसणार परीक्षेला

