Mahabreaking

🔴 BREAKING
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर

NAFED :वाडेगावात ‘आत्मनिर्भरता अभियान’अंतर्गत नाफेड खरेदी केंद्राचा शुभारंभ

NAFED : वाडेगाव परिसरातील शेतकऱ्यांना कडधान्य पिकाला योग्य मोबदला मिळावा यासाठी खामदेव महाराज अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या पुढाकारातून ‘आत्मनिर्भरता अभियान’ अंतर्गत National Agricultural Cooperative Marketing Federation of India Ltd (NAFED) मार्फत मॉडेल खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रावर तूर खरेदीचा शुभारंभ शुक्रवार, दि. २० फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडला.

NAFED
तूर खरेदीला ८ हजारांचा हमीभाव; शेतकऱ्यांना दिलासा; खामदेव महाराज अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनीचा पुढाकार

राहुल सोनोने 

वाडेगाव  : वाडेगाव परिसरातील शेतकऱ्यांना कडधान्य पिकाला योग्य मोबदला मिळावा यासाठी खामदेव महाराज अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या पुढाकारातून ‘आत्मनिर्भरता अभियान’ अंतर्गत National Agricultural Cooperative Marketing Federation of India Ltd (NAFED) मार्फत मॉडेल खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रावर तूर खरेदीचा शुभारंभ शुक्रवार, दि. २० फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडला.

या खरेदी केंद्रावर तुरीसाठी प्रतिक्विंटल ८,००० रुपयांचा हमीभाव जाहीर करण्यात आला असून यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. हिंमतराव घाटोळ यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाला बाळापूर तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष मनोहरराव राहणे यांच्यासह चंद्रशेखर चिंचोळकर, अरुण हुसे, अजय चिंचोळकर, प्रकाश कंडारकर, सहदेवराव चिंचोळकर, मुरलीधर मसने, चंद्रशेखर मसने, विलास वरोकार, विलास हसे, गोविंदराव मसने, अ‍ॅड. सुबोध डोंगरे, संतोष मसने, निरंजन नागरे, देवधर चिंचोळकर, उपसरपंच सुनील भाऊ घाटोळ, दीपक मसने, भास्कर काळे, राम जढाळ, वासुदेव कवळकार आदींसह परिसरातील बहुसंख्य प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

यावेळी वाडेगाव येथील शेतकरी सुनील चोपडे यांनी आपला माल विक्रीस आणून खरेदी प्रक्रियेला सुरुवात केली.

या नाफेड केंद्रामुळे बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना हमीभावाने तूर विक्रीची संधी उपलब्ध झाली असून दलालांच्या साखळीतून मुक्ती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांसाठी हे केंद्र लाभदायक ठरणार असल्याचा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

अकोला जिल्ह्यात उद्या शिष्यवृत्तीची रणधुमाळी; १७ हजारांहून अधिक विद्यार्थी देणार परीक्षा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top