Mahabreaking

🔴 BREAKING
Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला

scholarship exam :जिल्ह्यात उद्या पाचवी-आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा; २८ हजारांहून अधिक विद्यार्थी बसणार परीक्षेला

scholarship exam : इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा रविवार, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्ह्यात एकाच वेळी पार पडणार आहे. जिल्हाभरात एकूण २३१ परीक्षा केंद्रांवर तब्बल २८ हजार ६९ विद्यार्थ्यांची परीक्षा होणार असल्याने शिक्षण विभागाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

scholarship exam

बुलढाणा : इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा रविवार, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्ह्यात एकाच वेळी पार पडणार आहे. जिल्हाभरात एकूण २३१ परीक्षा केंद्रांवर तब्बल २८ हजार ६९ विद्यार्थ्यांची परीक्षा होणार असल्याने शिक्षण विभागाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

इयत्ता पाचवीसाठी १२६ केंद्रांची तर इयत्ता आठवीसाठी १०५ केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी १६,१६६ विद्यार्थी तर आठवीसाठी ११,९०३ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून हे सर्व विद्यार्थी निर्धारित केंद्रांवर परीक्षा देणार आहेत.

परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी यासाठी जिल्हास्तरावरून तेरा तालुक्यांमध्ये भरारी पथके नेमण्यात आली आहेत. तसेच तालुकास्तरावरही स्वतंत्र भेटींचे नियोजन करण्यात आले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी केंद्र संचालकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

विकास पाटील (शिक्षणाधिकारी, प्राथमिक) व जयमाला राठोड (जिल्हा समन्वयक) यांनी सर्व केंद्रप्रमुखांना परीक्षेसंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. परीक्षा शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्याच्या सूचना देत आवश्यक दक्षता घेण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

या परीक्षेच्या नियोजनासाठी ईश्वर वाघ, गजानन वाघ व श्रीकृष्ण जाधव हे सहायक जिल्हा समन्वयक म्हणून कार्यरत आहेत.

दरम्यान, जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेबाबत उत्सुकता असून प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top