Mahabreaking

🔴 BREAKING
Driving test will be completely digital :ड्रायव्हिंग टेस्ट होणार पूर्णपणे डिजिटल! अकोला आरटीओत ‘ऑटोमेटेड टेस्ट ट्रॅक’ उभारणीला सुरुवात burglary attempt :बीबी येथे भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न फसला; घरातच बंदिस्त केलेल्या चोरट्याला पोलिसांनी पकडले sand smugglers :रेती तस्करांचा पाठलाग करत महसूल पथकाची धडक कारवाई; टिप्पर जप्त Shocking incident :दगडवाडी फाट्यावर धक्कादायक घटना; चार अज्ञातांनी इसमाला कारमध्ये बसवून लुटले Clashes over solar pump dispute :विहिरीवरील सोलार पंपाच्या वादातून हाणामारी; रोहना येथे सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल Buddhist communitys bride-groom introduction : बाळापूर येथे बौद्ध समाजाचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात; अकोला-वाशिममधून प्रतिसाद Driving test will be completely digital :ड्रायव्हिंग टेस्ट होणार पूर्णपणे डिजिटल! अकोला आरटीओत ‘ऑटोमेटेड टेस्ट ट्रॅक’ उभारणीला सुरुवात burglary attempt :बीबी येथे भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न फसला; घरातच बंदिस्त केलेल्या चोरट्याला पोलिसांनी पकडले sand smugglers :रेती तस्करांचा पाठलाग करत महसूल पथकाची धडक कारवाई; टिप्पर जप्त Shocking incident :दगडवाडी फाट्यावर धक्कादायक घटना; चार अज्ञातांनी इसमाला कारमध्ये बसवून लुटले Clashes over solar pump dispute :विहिरीवरील सोलार पंपाच्या वादातून हाणामारी; रोहना येथे सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल Buddhist communitys bride-groom introduction : बाळापूर येथे बौद्ध समाजाचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात; अकोला-वाशिममधून प्रतिसाद

Sarpanch is the administrator :सिंदखेडराजा तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींवर सरपंचच प्रशासक; निवडणुका होईपर्यंत कारभार सांभाळणार

Sarpanch is the administrator : सिंदखेडराजा तालुक्यासह राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे, त्या ग्रामपंचायतींचा कारभार विद्यमान सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्याकडेच प्रशासक म्हणून सोपविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. यासंदर्भातील आदेश सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहेत.

Sarpanch is the administrator

अशोक इंगळे

साखरखेर्डा : सिंदखेडराजा तालुक्यासह राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे, त्या ग्रामपंचायतींचा कारभार विद्यमान सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्याकडेच प्रशासक म्हणून सोपविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. यासंदर्भातील आदेश सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहेत.

पूर्वी पंचायत समितीतील अधिकाऱ्यांना प्रशासक म्हणून नेमण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र, २० फेब्रुवारी रोजी नव्या आदेशाद्वारे महाराष्ट्र शासन यांनी ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलम १५१ उपकलम (१) खंड (अ) तसेच कलम १८२ पोटकलम (१) अंतर्गत अधिकारांचा वापर करून मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

शासनाचे अवर सचिव बा. म. आसोले यांनी संबंधित आदेश जारी केले असून, पुढील सहा महिने किंवा ग्रामपंचायत निवडणुका होईपर्यंत विद्यमान सरपंच, उपसरपंच व सदस्यांना प्रशासक म्हणून कामकाज करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे. या निर्णयास राज्यपालांच्या वतीने शासन सहसचिव वर्षा भरोसे यांनीही मान्यता दिली आहे.

सिंदखेडराजा तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींवर यापूर्वी पंचायत समितीतील अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नव्या आदेशामुळे साखरखेर्डा, शेंदुर्जन, मलकापूर पांग्रा, दुसरबीड, किनगावराजा आदी मोठ्या ग्रामपंचायतींतील सरपंचांना पुन्हा कामकाजाची संधी मिळाली आहे.

दरम्यान, साखरखेर्डा येथील सरपंच सौ. ज्योती अमित जाधव यांना सरपंचपदाची जबाबदारी स्वीकारून केवळ दहा महिने झाले होते. शासनाच्या नव्या निर्णयामुळे त्यांना पुन्हा काम करण्याची संधी मिळाली आहे. गावातील रस्ते, नाली आदी विकासकामे गतीने पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top