Mahabreaking

[breaking_news]

Santosh Borgaonkar: संतोष बोरगावकर यांच्याकडून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा

Santosh Borgaonkar: स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. २, बोरगाव मंजू येथे प्रसिद्ध उद्योजक संतोष बोरगावकर यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. शाळा परिसर तसेच विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांचा त्यांनी मनसोक्त आनंद लुटला. संतश्री गोरा कुंभार यांच्या जीवनावर आधारित सादर केलेली संगीतमय नाटिका त्यांना विशेष भावली.

Santosh Borgaonkar

बोरगाव मंजू : स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. २, बोरगाव मंजू येथे प्रसिद्ध उद्योजक संतोष बोरगावकर यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. शाळा परिसर तसेच विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांचा त्यांनी मनसोक्त आनंद लुटला. संतश्री गोरा कुंभार यांच्या जीवनावर आधारित सादर केलेली संगीतमय नाटिका त्यांना विशेष भावली.

शाळेच्या शिक्षिका स्वाती विवेक पाटील यांच्या ते गुरुबंधू असून, महाराष्ट्रातील प्रख्यात केमिकल उद्योजक आहेत. त्यांची जगभरातील सुमारे १५ देशांत उद्योगस्थळे असून, बोरगाव मंजू येथील जन्मभूमीपासून अकोला येथे शिक्षण आणि नागपूर विद्यापीठामधून सायन्स पदवी घेत त्यांनी गाठलेली उद्योगजगताची उंची प्रेरणादायी आहे.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी आपले अनुभव विद्यार्थ्यांसमोर उत्कटतेने मांडले. वर्ग चौथीतील विद्यार्थिनी आराध्या वर्षा रामेश्वर गिन्हे हिने पत्रकार बनून त्यांची मुलाखत घेतली आणि विविध प्रश्न विचारत त्यांचे जीवनकार्य जाणून घेतले.

बोरगावकर दाम्पत्यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून त्यांना आनंदित केले. शालेय विद्यार्थ्यांच्या भौतिक गरजा लक्षात घेऊन त्यांनी ५०० लिटर क्षमतेचे वॉटर फिल्टर यंत्र बसवण्याचे अभिवचन शाळेला दिले. ही सुविधा विद्यार्थ्यांसाठी आरोग्यदायी आणि प्रेरणादाय ठरणार आहे.

एक मोठा उद्योजक स्वतःहून विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढे येताना पाहून पालक, ग्रामस्थ आणि शालेय समुदायातून समाधान व्यक्त केले जात आहे. विद्यार्थ्यांनीही संतोष बोरगावकर यांचे मनापासून आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक रविंद्र उमाळे, संतोष काळणे, नेहा देशपांडे, शिला जानोरकर, वर्षा गिन्हे आणि प्रगती तायडे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्वाती देशपांडे यांनी बोरगावकर दाम्पत्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी आणि शैक्षणिक उपक्रमांनी उपस्थितांचे मन जिंकले. सुंदर नृत्ये आणि आदर्श मुलाखतींचा ठसा सोडत उद्योजक बोरगावकर दाम्पत्य आपापल्या मलकापूर येथील निवासस्थानी परतले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top