Mahabreaking

[breaking_news]

  Police arrest : फरार असलेल्या अट्टल गुन्हेगाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Police arrest : एटीएम फोडीसह अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेल्या फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अटक करून मोठे यश मिळविले आहे.
तामगाव पोलिस स्टेशनच्या अंतर्गत कलम ३९५, ३८०, ४२७, ३४ भादवी या गुन्ह्यांमध्ये तसेच २०२४ पासून सुरू असलेल्या एटीएम फोडी प्रकरणांत आरोपी साजिद खान उर्फ जम्मू झाडी बशीर खान (वय ३४, रा. जालना) हा सतत फरार होता. त्याच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे पथक सक्रिय होते.१० डिसेंबर २०२५ रोजी पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. अटकेनंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला तामगाव पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले.

Police arrest
बुलढाणा : एटीएम फोडीसह अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेल्या फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अटक करून मोठे यश मिळविले आहे.
तामगाव पोलिस स्टेशनच्या अंतर्गत कलम ३९५, ३८०, ४२७, ३४ भादवी या गुन्ह्यांमध्ये तसेच २०२४ पासून सुरू असलेल्या एटीएम फोडी प्रकरणांत आरोपी साजिद खान उर्फ जम्मू झाडी बशीर खान (वय ३४, रा. जालना) हा सतत फरार होता. त्याच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे पथक सक्रिय होते.१० डिसेंबर २०२५ रोजी पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. अटकेनंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला तामगाव पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले. या अटकेमुळे परिसरातील एटीएम कटिंग प्रकरणाला महत्त्वपूर्ण कलाटणी मिळाली असून पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलिस अधीक्षक बुलढाणा/खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलिस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशाने करण्यात आली.कारवाईत पोलिस उपनिरीक्षक पंकज सपकाळे, हेकॉ एजाज खान, पोकॉ अमोल शेजोल, पोकॉ अजीस परसूवाले, कैलास ठोंबरे, शिवानंद हेलगे यांनी सक्रिय सहभाग घेतला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top