Mahabreaking

🔴 BREAKING
Bhim Jayanti :साखरखेर्डा नगरीत भीमजयंतीचा उत्साह;  लेझीम , टिपरी नृत्याने वेधले लक्ष Two Houses Burglarized :गंगानगरमध्ये चोरट्यांचा हैदोस, दोन घरे फोडली; सोने,चांदीची दागिणे केले लंपास The Bell Rings Again :17 वर्षांनी पुन्हा घंटा वाजली; दीनदयाल महाविद्याल;यात माजी विद्यार्थ्यांचा भावनिक ‘गेट टुगेदर’ Neminath Maharaj Saptah :ब्राह्मण चिकना येथे नेमिनाथ महाराज सप्ताहाची महाप्रसादाने सांगता Complaints of solar agricultural pump :सौर कृषी पंपधारकांच्या तक्रारींचा होणार जागेवरच निपटारा Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Bhim Jayanti :साखरखेर्डा नगरीत भीमजयंतीचा उत्साह;  लेझीम , टिपरी नृत्याने वेधले लक्ष Two Houses Burglarized :गंगानगरमध्ये चोरट्यांचा हैदोस, दोन घरे फोडली; सोने,चांदीची दागिणे केले लंपास The Bell Rings Again :17 वर्षांनी पुन्हा घंटा वाजली; दीनदयाल महाविद्याल;यात माजी विद्यार्थ्यांचा भावनिक ‘गेट टुगेदर’ Neminath Maharaj Saptah :ब्राह्मण चिकना येथे नेमिनाथ महाराज सप्ताहाची महाप्रसादाने सांगता Complaints of solar agricultural pump :सौर कृषी पंपधारकांच्या तक्रारींचा होणार जागेवरच निपटारा Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Mayor Kishore Garole :सफाई कामगारांचे कामबंद आंदोलन मागे; नगराध्यक्ष किशोर गारोळेंचा धडाका!

Mayor Kishore Garole : शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर टप्प्यावर पोहोचलेला असतानाच नगराध्यक्ष किशोर गारोळे यांनी पदभार स्वीकारताच ‘ॲक्शन मोड’मध्ये येत सफाई कामगारांचे कामबंद आंदोलन बुधवारी मोडीत काढले. संक्रांत सणाच्या दिवशीही रात्री साडेनऊ वाजता नगरपरिषदेचे दालन उघडून तातडीची बैठक घेत, त्यांनी प्रशासकीय संवेदनशीलता, कर्तव्यनिष्ठा आणि ठाम नेतृत्वाचे दर्शन घडवले.

Mayor Kishore Garole'
संक्रांत सणाच्या रात्री साडेनऊला नपाचे दालन उघडले; सफाई कामगारांचे प्रश्न जागीच निकाली

मेहकर : शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर टप्प्यावर पोहोचलेला असतानाच नगराध्यक्ष किशोर गारोळे यांनी पदभार स्वीकारताच ‘ॲक्शन मोड’मध्ये येत सफाई कामगारांचे कामबंद आंदोलन बुधवारी मोडीत काढले. संक्रांत सणाच्या दिवशीही रात्री साडेनऊ वाजता नगरपरिषदेचे दालन उघडून तातडीची बैठक घेत, त्यांनी प्रशासकीय संवेदनशीलता, कर्तव्यनिष्ठा आणि ठाम नेतृत्वाचे दर्शन घडवले.

१ डिसेंबरपासून वेतन न मिळणे, वेळेवर पगार न होणे, वेतन कपात तसेच हातमोजे, सॅनिटायझर, बूट यांसारखी अत्यावश्यक सुरक्षा साधने न पुरविल्याच्या निषेधार्थ शहरातील सफाई कामगारांनी कामबंद आंदोलन छेडले होते. परिणामी संपूर्ण शहरातील स्वच्छता व्यवस्था कोलमडण्याच्या मार्गावर होती.

ही स्थिती गंभीर असल्याचे ओळखून नगराध्यक्ष किशोर गारोळे यांनी स्वतः पुढाकार घेत सफाई कामगारांशी थेट संवाद साधला. कामगारांच्या समस्या ऐकून घेताना त्यांनी ठाम शब्दांत सुनावले, “तुमचे आरोग्य आमच्यासाठी सर्वोच्च आहे. तुम्हाला काही झाले, तर तुमचे कुटुंब उघड्यावर पडेल. अशा हलगर्जीपणाला कोणतीही माफी नाही.”

नगराध्यक्ष गारोळे यांनी १५ जानेवारी रोजीच सर्व सफाई कामगारांच्या खात्यात वेतन जमा होईल, असे ठोस आश्वासन दिले. तसेच, “तुम्हीही या नगरपरिषदेचे नगराध्यक्षच आहात. कुठलीही अडचण असेल, तर रात्री एक वाजताही मी व माझे सहकारी तत्काळ दखल घेऊ,” असे सांगत कामगारांचा विश्वास संपादन केला.

नगराध्यक्षांच्या या ठाम भूमिकेनंतर सफाई कामगारांनी टाळ्यांच्या गजरात किशोर गारोळे यांचे अभिनंदन करत कामबंद आंदोलन मागे घेतले. यावेळी गटनेते विलास चनखोरे, नगरसेवक सतीश ताजने, महेश रिंढे, नितीन तुपे, अमर घोडे, निसार अन्सारी, युवासेना तालुका अधिकारी अॅड. आकाश घोडे, नारायण पचेरवाल, सुमित धोटे, गोपाळ गायकवाड यांच्यासह नगरपरिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, संबंधित कंत्राटदाराने यापुढे सफाई कामगारांच्या बाबतीत कोणतीही हलगर्जी केल्यास थेट कंत्राट रद्द करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा नगराध्यक्ष किशोर गारोळे यांनी दिला. कामबंद आंदोलन मोडीत काढत जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर तात्काळ निर्णय घेणारे नगराध्यक्ष किशोर गारोळे शहराच्या राजकारणात पूर्णपणे ‘ॲक्शन मोड’मध्ये आल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top