Mahabreaking

[breaking_news]

Sand Mafia :खडकपूर्णा धरण परिसरात रेती माफियांचा डाव उघड; अवैध रस्ता तयार करून वाहतूक

Sand Mafia :तालुक्यातील खडकपूर्णा धरण परिसरात अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, यासाठी थेट शेतातूनच बेकायदेशीर रस्ता तयार केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sand Mafia
देऊळगाव राजा तालुक्यात अवैध रेती उपसा; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

देऊळगाव राजा : तालुक्यातील खडकपूर्णा धरण परिसरात अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, यासाठी थेट शेतातूनच बेकायदेशीर रस्ता तयार केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्राम महसूल अधिकारी ज्ञानेश्वर विष्णु तांबे (रा. दत्तनगर, देऊळगाव राजा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परमेश्वर शिवाजी पटावकर, अंकुश लिंबाजी भागिले आणि विश्मयबर व्यंकट देशमुख (सर्व रा. टाकरखेड भागिले, ता. देऊळगाव राजा) यांच्याविरुद्ध कायम अप. क्र. ११४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(२), ६२, ३(५) तसेच जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम ४८(७) व ४८(८) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
१० मार्च रोजी दुपारी २ ते ४ वाजताच्या दरम्यान खडकपूर्णा धरणाच्या मेहुणा राजा परिसरात पाहणी करत असताना हा प्रकार उघडकीस आला. आरोपींनी त्यांच्या खाजगी शेतजमिनीतून (गट क्रमांक २७२, २७३ व २७४) थेट जलाशयाकडे जाणारा रस्ता तयार केला होता. हा रस्ता केवळ अवैध रेती वाहतुकीसाठीच मुद्दाम तयार करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
विशेष म्हणजे, या रस्त्याचा वापर करून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर रेतीची वाहतूक केली जात होती. तसेच जलाशयाच्या काठावर अवैधरीत्या रेती उपसा करून साठवणुकीसाठी दोन मोठे खड्डे तयार केल्याचेही आढळून आले. या सर्व प्रकारामुळे शासनाच्या महसुलाला मोठा फटका बसत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तहसीलदार, देऊळगाव राजा यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली असून २४ मार्च रोजी सायंकाळी गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस हेड कॉन्स्टेबल मुसा बनं यांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल साळवे करीत आहेत. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून अवैध रेती माफियांवर प्रशासनाने कडक कारवाईचा बडगा उगारल्याचे दिसून येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top