Mahabreaking

🔴 BREAKING
Bhim Jayanti :साखरखेर्डा नगरीत भीमजयंतीचा उत्साह;  लेझीम , टिपरी नृत्याने वेधले लक्ष Two Houses Burglarized :गंगानगरमध्ये चोरट्यांचा हैदोस, दोन घरे फोडली; सोने,चांदीची दागिणे केले लंपास The Bell Rings Again :17 वर्षांनी पुन्हा घंटा वाजली; दीनदयाल महाविद्याल;यात माजी विद्यार्थ्यांचा भावनिक ‘गेट टुगेदर’ Neminath Maharaj Saptah :ब्राह्मण चिकना येथे नेमिनाथ महाराज सप्ताहाची महाप्रसादाने सांगता Complaints of solar agricultural pump :सौर कृषी पंपधारकांच्या तक्रारींचा होणार जागेवरच निपटारा Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Bhim Jayanti :साखरखेर्डा नगरीत भीमजयंतीचा उत्साह;  लेझीम , टिपरी नृत्याने वेधले लक्ष Two Houses Burglarized :गंगानगरमध्ये चोरट्यांचा हैदोस, दोन घरे फोडली; सोने,चांदीची दागिणे केले लंपास The Bell Rings Again :17 वर्षांनी पुन्हा घंटा वाजली; दीनदयाल महाविद्याल;यात माजी विद्यार्थ्यांचा भावनिक ‘गेट टुगेदर’ Neminath Maharaj Saptah :ब्राह्मण चिकना येथे नेमिनाथ महाराज सप्ताहाची महाप्रसादाने सांगता Complaints of solar agricultural pump :सौर कृषी पंपधारकांच्या तक्रारींचा होणार जागेवरच निपटारा Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Foot Slips Life Lost :पाय घसरला अन् जीव गेला; दगडवाडीत विहिरीत पडून महिलेचा अंत

Foot Slips Life Lost :तालुक्यातील दगडवाडी येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून, विहिरीत पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Foot Slips Life Lost

जनावरांना खाऊ घालताना घडली दुर्घटना; ५८ वर्षीय महिलेचा बुडून मृत्यू

देऊळगाव राजा : तालुक्यातील दगडवाडी येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून, विहिरीत पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सौ. चंद्रकला वसंता यंगड (वय ५८, रा. दगडवाडी) या २४ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता घराजवळील विहिरीजवळ गावातील सोडलेल्या जनावरांना भाकरी टाकण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी अचानक त्यांचा तोल जाऊन पाय घसरल्याने त्या विहिरीत पडल्या. पाण्यात बुडाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या प्रकरणी त्यांचे पती वसंता आश्रुजी यंगड (वय ६५) यांनी दिलेल्या तोंडी माहितीवरून देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात मर्ग क्र. ३१/२०२६ अन्वये नोंद करण्यात आली आहे. सदर प्रकरणाची नोंद म. पोहेकॉ. उईके यांनी केली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल काकड करीत आहेत. या घटनेमुळे दगडवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top