Mahabreaking

[breaking_news]

Samarth Pharmacy :समर्थ फार्मसीची यशाची परंपरा कायम; बी.फार्म प्रथम वर्षाचा १०० टक्के निकाल

Samarth Pharmacy : श्री गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्था संचलित समर्थ औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचा शैक्षणिक सत्र २०२५-२६ मधील बी.फार्मसी प्रथम वर्ष (सत्र-दुसरे) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, महाविद्यालयाने पुन्हा एकदा शंभर टक्के यशाची परंपरा कायम राखली आहे. विशेष म्हणजे सर्व विद्यार्थी सर्वोच्च श्रेणी व उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले असून, यंदाही विद्यार्थिनींनी गुणवत्ता यादीत आघाडी घेतली आहे.

Samarth Pharmacy

  उत्कृष्ट निकालाने समर्थ फार्मसीचा झेंडा उंचावला; मयुरी कुहिरे प्रथम

गजानन तिडके

देऊळगाव राजा : श्री गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्था संचलित समर्थ औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचा शैक्षणिक सत्र २०२५-२६ मधील बी.फार्मसी प्रथम वर्ष (सत्र-दुसरे) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, महाविद्यालयाने पुन्हा एकदा शंभर टक्के यशाची परंपरा कायम राखली आहे. विशेष म्हणजे सर्व विद्यार्थी सर्वोच्च श्रेणी व उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले असून, यंदाही विद्यार्थिनींनी गुणवत्ता यादीत आघाडी घेतली आहे.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि शिस्तबद्ध शैक्षणिक वातावरणाच्या बळावर उल्लेखनीय यश संपादन केले. “जिद्द आशा बांध गाठी, झेप घे तू घे भरारी, टाक मागे व्यर्थ भीती, सोस तू आघात सारे” या प्रेरणादायी ओळींना साजेशी कामगिरी विद्यार्थ्यांनी करून दाखवली.

निकालात मयुरी कुहिरे हिने ६०७ गुण व ८.७९ एसजीपीए मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. ऋतुजा सोळंके हिने ६०३ गुण व ८.७९ एसजीपीएसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर पल्लवी किंगरे हिने ८.५५ एसजीपीए मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

अवघ्या सात वर्षांच्या कालावधीत समर्थ औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाने दर्जेदार शिक्षणामुळे आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात असून, त्याचेच फलित या उत्कृष्ट निकालातून दिसून येत आहे. महाविद्यालयात डी.फार्मसी, बी.फार्मसी तसेच एम.फार्मसी (फार्माकोग्नोसी, फार्माकोलॉजी आणि फार्मास्युटिक्स) हे अभ्यासक्रम यशस्वीपणे राबविले जात आहेत.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती नंदाताई कायंदे, सचिव सतीशभाऊ कायंदे, सहसचिव तथा आमदार मनोजभाऊ कायंदे, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य डॉ. पी. आर. ताठे, उपप्राचार्य डॉ. जी. आर. सिताफळे, विभागप्रमुख डॉ. पी. आर. लड्डा, प्रा. के. बी. चराटे, डॉ. पी. एस. नारखेडे तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करून अभिनंदन केले.

यावेळी प्राचार्य डॉ. पी. आर. ताठे यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत, महाविद्यालय त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने मार्गदर्शन व सर्वतोपरी सहकार्य करीत राहील, अशी ग्वाही दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top