Mahabreaking

[breaking_news]

Employment Fair :वाडेगावात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; ९१ रिक्त पदांसाठी युवकांना सुवर्णसंधी

Employment Fair : नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित युवक-युवतींना स्थानिक तसेच इतर जिल्ह्यांतील नामांकित खाजगी कंपन्या, कारखाने आणि उद्योगसमूहांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वाडेगाव येथे मंगळवार, दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे.

Employment Fair

  सुशिक्षित युवक-युवतींसाठी आनंदाची बातमी! वाडेगावात ११ ऑगस्टला रोजगार मेळावा

राहुल सोनोने

 वाडेगाव : नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित युवक-युवतींना स्थानिक तसेच इतर जिल्ह्यांतील नामांकित खाजगी कंपन्या, कारखाने आणि उद्योगसमूहांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वाडेगाव येथे मंगळवार, दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला, मॉडेल करिअर सेंटर, अकोला तसेच श्री जागेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वाडेगाव (ता. बाळापूर, जि. अकोला) यांच्या संयुक्त विद्यमाने हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात येत आहे.

या मेळाव्यात विविध उद्योग व कंपन्यांमधील एकूण ९१ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रिसीजन मॅपिंग जीआयएस प्रा. लि., अमरावती (१० पदे), लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन लिमिटेड, अकोला (३० पदे), गुजरात अंबुजा एक्सपोर्ट्स लि., बाळापूर (१० पदे), बीव्हीजी इंडिया लि., पुणे (३२ पदे), श्री जागेश्वर विद्यालय, वाडेगाव (६ पदे) तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अंजुमन अन्वारुल इस्लाम उर्दू प्राथमिक शाळा, बाळापूर (३ पदे) अशा विविध आस्थापनांचा समावेश आहे.

संबंधित कंपन्यांचे प्रतिनिधी मेळाव्यात प्रत्यक्ष उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेणार असून, पात्र उमेदवारांना तत्काळ रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

मेळाव्यात सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ‘Employment’ विभागातील ‘Job Seeker’ पर्यायाद्वारे नोंदणी करावी. त्यानंतर लॉग-इन करून ‘Job Fair’ पर्यायात अकोला जिल्हा निवडून संबंधित रोजगार मेळाव्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर नोंदणीची प्रिंट काढून ठेवावी.

नोंदणीसंदर्भात काही अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला यांच्या (०७२४) २४३३८४९ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा akolarojgar@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा.

उमेदवारांनी दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी श्री जागेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वाडेगाव येथे स्वतःच्या खर्चाने बायोडाटा, नोंदणी स्लिप, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र तसेच आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन प्रफुल्ल सु. शेळके, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top