Mahabreaking

🔴 BREAKING
Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला

Sakharkherda strictly closed :चिखला काकड प्रकरणाच्या निषेधार्थ साखरखेर्डा कडकडीत बंद; सर्वपक्षीय पाठिंबा

Sakharkherda strictly closed : चिखला काकड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या वादातून महिलांवर कथित मारहाणीची घटना घडल्याच्या निषेधार्थ साखरखेर्डा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला नागरिक, व्यापारी तसेच विविध संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Sakharkherda strictly closed

साखरखेर्डा : चिखला काकड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या वादातून महिलांवर कथित मारहाणीची घटना घडल्याच्या निषेधार्थ साखरखेर्डा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला नागरिक, व्यापारी तसेच विविध संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

बिबी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिखला काकड येथे काही दिवसांपूर्वी अज्ञात युवकांनी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची स्थापना केली होती. पुतळा हटवण्याबाबत ग्रामपंचायतीने बैठक बोलावली होती. या बैठकीत पुतळा हटवण्यास उबाठा महिला उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ यांनी विरोध दर्शविला. त्यांच्यासह काही महिला पुतळ्यासमोर ठाण मांडून बसल्या होत्या.

दरम्यान, सरपंच काही युवक व महिलांसह घटनास्थळी आले. त्यानंतर संजीवनी वाघ व इतर महिलांवर मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच अंगावरील कपडे फाडण्याचा प्रयत्न झाल्याचीही माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती परिसरात पसरताच जिल्ह्यातील शिवप्रेमी युवक मोठ्या संख्येने चिखला काकड येथे दाखल झाले.

घटनास्थळी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात, मराठा सेवा संघ चे अॅड. निशिकांत राजे जाधव, शिवसेना आमदार संजय गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र खेडेकर, तसेच चिखलीच्या आमदार स्वताताई महाले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मराठा आरक्षण संघर्ष समितीचे मनोज जरांगे यांच्या आगमनानंतर परिसरात घोषणाबाजी झाली. काही कार्यकर्त्यांनी दोन्ही माजी आमदारांविरोधात नाराजीही व्यक्त केली.

दरम्यान, साखरखेर्डा येथील सामाजिक कार्यकर्ते संतोषराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली साखरखेर्डा पोलीस स्टेशन येथे जाऊन पोलिस हेड कॉन्स्टेबल निवृत्ती पोफळे यांना बंदचे निवेदन देण्यात आले. यावेळी अरुण देशमुख, सुधाकर पऱ्हाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस शुभम राजपूत, अमित जाधव, वैभव पवार, राजू काटे, पवन जाधव, रविंद्र पऱ्हाड, सोनू पवार, विलास रिंढे, सुनील रिंढे, गिताराम तायडे आदी उपस्थित होते.

आज सर्वपक्षीय नेत्यांनी दिलेल्या बंदच्या आवाहनाला सर्व स्तरांतून पाठींबा मिळाल्याने साखरखेर्डा येथे व्यवहार पूर्णतः ठप्प राहिले. प्रशासनाकडून घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

जिल्ह्यातील इतर बातम्यासाठी बुलढाणा या पेजला भेट द्या 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top