Mahabreaking

🔴 BREAKING
Villagers aggressive :दुसरबीडमध्ये पाणी, गटारी व रस्त्यांच्या प्रश्नावर ग्रामस्थ आक्रमक Digambar Lokhande :जिल्हा परिषद शाळेमधूनच अधिकारी तयार होतात:   दिगंबर लोखंडे     22-Year-Old Man :जलतरण तलावामध्ये  22 वर्षीय तरुणाचा बुडाल्याने मृत्यू Maharashtra Provincial Tailik Mahasabha :महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, बुलढाणा जिल्हा कार्यकारिणी जाहीर Two Accused in Robbery Case :जबरी चोरीतील दोन आरोपी गजाआड; रोख रक्कम,दुचाकीसह १.४७ लाखांचा एवज जप्त Wife Murdered :यावलखेडमध्ये कौटुंबिक वादातून पत्नीचा चाकूने केला खून; आरोपी पतीला अवघ्या तासाभरात अटक Villagers aggressive :दुसरबीडमध्ये पाणी, गटारी व रस्त्यांच्या प्रश्नावर ग्रामस्थ आक्रमक Digambar Lokhande :जिल्हा परिषद शाळेमधूनच अधिकारी तयार होतात:   दिगंबर लोखंडे     22-Year-Old Man :जलतरण तलावामध्ये  22 वर्षीय तरुणाचा बुडाल्याने मृत्यू Maharashtra Provincial Tailik Mahasabha :महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, बुलढाणा जिल्हा कार्यकारिणी जाहीर Two Accused in Robbery Case :जबरी चोरीतील दोन आरोपी गजाआड; रोख रक्कम,दुचाकीसह १.४७ लाखांचा एवज जप्त Wife Murdered :यावलखेडमध्ये कौटुंबिक वादातून पत्नीचा चाकूने केला खून; आरोपी पतीला अवघ्या तासाभरात अटक

Revenue Squad Launches :अवैध रेतीवाहतुकीवर महसूल पथकाची धडक कारवाई; १०.२० लाखांचा मुद्देमाल केला जप्त 

Revenue Squad Launches :तालुक्यातील नारायणखेड परिसरात अवैध रेती चोरी आणि वाहतुकीवर महसूल विभागाने मोठी कारवाई करत १० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वाहन मालकासह तिघांविरुद्ध पोलीस स्टेशन अंढेरा येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Revenue Squad Launches
देऊळगाव राजा :तालुक्यातील नारायणखेड परिसरात अवैध रेती चोरी आणि वाहतुकीवर महसूल विभागाने मोठी कारवाई करत १० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वाहन मालकासह तिघांविरुद्ध पोलीस स्टेशन अंढेरा येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खैरखेड येथे वीजेचा शॉक लागून युवा शेतकऱ्याचा मृत्यू  

या प्रकरणात फिर्यादी ज्ञानेश्वर विष्णू तांबे (वय ३६), ग्राम महसूल अधिकारी, नारायणगाव, ता. देऊळगाव राजा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. ३ एप्रिल २०२६ रोजी रात्री ११ वाजता माननीय तहसीलदार यांच्या आदेशानुसार अवैध रेती नियंत्रण पथक नारायणखेड येथे गस्तीवर गेले होते. गावाच्या दक्षिण भागातील बळीराम उर्फ बाळू प्रकाश मुंडे यांच्या गट क्रमांक २१० मधील शेतातून येणाऱ्या रस्त्यावर एक विना क्रमांकाचे पिवळ्या रंगाचे टिप्पर संशयास्पद स्थितीत येताना दिसले. पथकाने वाहनाला थांबविल्यानंतर तपासणी केली असता त्यामध्ये विनापरवाना चोरी केलेली ४ ब्रास रेती, किंमत अंदाजे २० हजार रुपये, आढळून आली. तसेच टिप्परची किंमत सुमारे १० लाख रुपये असल्याने एकूण १० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल समोर आला. दरम्यान, वाहन कोणाचे आहे अशी विचारणा केली असता ते बळीराम उर्फ बाळू मुंडे यांचे असल्याचे चालकाने सांगितले. काही वेळातच बाळू मुंडे घटनास्थळी येऊन महसूल पथकाशी हुज्जत घालू लागले. यानंतर सतीश सरोदे (रा. नागणगाव) यांचा जेसीबी बोलावून टिप्परमधील रेती हायड्रोलिक करून पांगविण्यात आली, ज्यामुळे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर चालकाला टिप्पर घेऊन पळून जाण्यास सांगण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यावेळी महसूल पथकाला “तुम्हाला पाहून घेईन” अशी धमकी देत शिवीगाळही करण्यात आली, त्यामुळे शासकीय कामात अडथळा आणल्याचा स्वतंत्र गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी  बळीराम उर्फ बाळू प्रकाश मुंडे, रा. नारायणखेड ,सतीश सरोदे, नागणगाव  व विना क्रमांकाच्या टिप्परचा चालक  यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही धडक कारवाई उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वैशाली डोंगरजाळ, तहसीलदार देऊळगाव राजा यांच्या नियोजनातून पार पडली. पथकात मंडळ अधिकारी पी. टी. जायभाये, आर. एम. मांटे, विनोद डोईफोडे तसेच ग्राम महसूल अधिकारी ज्ञानेश्वर तांबे आणि संजय बरांडे यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध रेती तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top