peace rally :दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला व सामाजिक कार्यकर्त्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला गुरुवारी (२३ जुलै) बाळापूर-पातूर परिसरातील प्रमुख व्यापारी केंद्र असलेल्या वाडेगावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावातील व्यापारी प्रतिष्ठाने, शाळा व महाविद्यालये बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला.

वाडेगावात महाराष्ट्र बंदला प्रतिसाद; विद्यार्थी प्रश्नावर वंचित बहुजन आघाडी आक्रमक
राहुल सोनोने
वाडेगाव : दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला व सामाजिक कार्यकर्त्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला गुरुवारी (२३ जुलै) बाळापूर-पातूर परिसरातील प्रमुख व्यापारी केंद्र असलेल्या वाडेगावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावातील व्यापारी प्रतिष्ठाने, शाळा व महाविद्यालये बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला.

वंचित बहुजन आघाडीचे बाळापूर तालुकाध्यक्ष सुगत डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, विविध सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. सिद्धार्थ नगर येथून सुरू झालेली रॅली बसस्थानक, श्री जागेश्वर विद्यालय, बेसिक शाळा, अशोक नगर, महात्मा फुले चौक, जुनी ग्रामपंचायत, सोफी चौक, बजरंग चौक मार्गे बाळापूर वेश आणि पोलीस चौकीसमोर पोहोचली. तेथे ठिय्या आंदोलन करून विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा निषेध व्यक्त करण्यात आला.

आंदोलनादरम्यान दर्शन इगळे, नाजुकराव इगळे, गजानन डोंगरे, अफसर खान, ॲड. सुबोध डोंगरे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष बब्बुभाई ठेकेदार, ज्येष्ठ नेते शामलाल लोध, दादाराव डोंगरे, गौतम डोंगरे, गजानन जंजाळ, प्रकाश कंडारकर, शिवसेना नेते दीपक मसने, राजू पळसकार आदींनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

बंद यशस्वी करण्यासाठी दयाराम डोंगरे, हरिदास डोंगरे, जितेंद्र डोंगरे, दिनेश धाडसे, युवराज डोंगरे, बाळू डोंगरे, भारत डोंगरे, राष्ट्रपाल डोंगरे, सचिन तिडके, भीमराव डोंगरे, रामकृष्ण सोनटक्के, गौतम खंडारे, शिवदास डोंगरे, अक्षय इंगळे, सुधाकर भारसाकडे, संतोष इगळे, अमोल अवचार, राजू जंजाळ, विजू डोंगरे, मनोज पातोडे, नंदन इगळे, रमेश जंजाळ, राजकुमार खरात, नितेश डोंगरे, आकाश डोंगरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ सहभागी झाले.
रॅलीचे सूत्रसंचालन तालुका युवक आघाडीचे अध्यक्ष सुगत डोंगरे यांनी केले, तर प्रास्ताविक जितेंद्र डोंगरे यांनी केले.
बंदच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वाडेगाव पोलीस चौकीचे प्रभारी खाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलन शांततेत पार पडल्याचे पोलिसांनी सांगितले.
राजकीयदृष्ट्या पाहता, विद्यार्थी प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीने ग्रामीण भागात जनआंदोलन उभारण्याचा प्रयत्न केला असून, त्याला काही स्थानिक राजकीय व सामाजिक संघटनांचाही पाठिंबा मिळाल्याचे या आंदोलनातून दिसून आले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून जनआंदोलनांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढविण्याचे प्रयत्न अधिक तीव्र होत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

