Mahabreaking

[breaking_news]

Blood donation camp :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त साखरखेर्ड्यात रक्तदान शिबिर

Blood donation camp : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने साखरखेर्डा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ५० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

Blood donation camp

साखरखेर्डा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने साखरखेर्डा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ५० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

यावेळी बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे म्हणाले, “महाराष्ट्रात भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर शेतकरी, शेतमजूर, महिला आणि समाजातील विविध घटकांसाठी अनेक लोककल्याणकारी योजना राबविण्यात आल्या आहेत. आज राज्यासह देशात अनेक रुग्ण विविध आजारांवर उपचार घेत असून त्यांना रक्ताची नितांत गरज भासते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अधिकाधिक नागरिकांनी रक्तदान करून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचा संकल्प करावा. भाजपच्या वतीने राज्यभर रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, साखरखेर्डा येथील युवकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून मोलाचे योगदान दिले आहे.”

या रक्तदान शिबिरास भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे, भाजप ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुनील कायंदे, प्रदेश सदस्य उल्हास देशपांडे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष दसरे, शंकरराव उगलमुगले, गजानन घुले, गणेश नागरे, अंकुर देशपांडे, दीपक रिंढे, निलय बंगाळे, दिगंबर गाडे, राहुल झोरे, कृष्णा सपकाळ, संदीप वाघ, गोपाल पाझडे, सुनील काळूसे, सुधाकर गिते, प्रभाकर कायंदे, दीपक घुगे, अमोल अवचार, अशोक पाटील, बालाजी नाझरकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top