Gram Rojgar Sevaks: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांसह पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांचा स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट रोजी विशेष सत्कार करण्यात आला. गटविकास अधिकारी मुकेशजी माहोर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कारार्थींना गौरविण्यात आले.

गावांच्या विकासात योगदान देणाऱ्या ‘मनरेगा’च्या शिलेदारांचा स्वातंत्र्यदिनी सन्मान
गजानन तिडके
देऊळगाव राजा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांसह पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांचा स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट रोजी विशेष सत्कार करण्यात आला. गटविकास अधिकारी मुकेशजी माहोर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कारार्थींना गौरविण्यात आले.
मनरेगा योजनेच्या माध्यमातून गावागावांत जलसंधारणाची कामे, घरकुल, रस्ते तसेच विविध पायाभूत सुविधांची कामे दर्जेदारपणे पूर्ण करण्यात आली. ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देत गावांचा कायापालट करण्यामध्ये ग्रामरोजगार सेवक व पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत हा गौरव करण्यात आला.
सन्मानित ग्रामरोजगार सेवक :
विठ्ठल वाघ (ग्रा. पं. पांगरी), राजू बोबडे (ग्रा. पं. अंभोरा), प्रकाश ताकतोडे (ग्रा. पं. बायगाव बुद्रुक), गजानन दणके (ग्रा. पं. धोत्रा नंदई), नरहरी काकड (ग्रा. पं. गारगुंडी), सुभाष एडके (ग्रा. पं. गोळेगाव), श्रीकृष्ण गाटोळे (ग्रा. पं. जवळखेड), विठ्ठल शिंदे (ग्रा. पं. मेव्हणाराजा), रावसाहेब सरोदे (ग्रा. पं. नागनगाव), अविनाश मुंडे (ग्रा. पं. पळसखेड झाल्टा), देवानंद साळवे (ग्रा. पं. पिंपरी आंधळे), सविता काकड (ग्रा. पं. सिंनगाव जहागीर), गजानन नांदवे (ग्रा. पं. टाकरखेड वायाळ), सुनील कोल्हे (ग्रा. पं. तुळजापूर) आणि गजानन कंकाळ (ग्रा. पं. उंबरखेड).
उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार प्राप्त पंचायत समिती कर्मचारी :
दीपक शिंगणे (कनिष्ठ सहाय्यक), उमेश घुसळकर (वरिष्ठ लिपिक), अरुण शेळके (तांत्रिक अधिकारी), शहनाज सय्यद (तांत्रिक अधिकारी), योगेश नाईकवाडे (तांत्रिक अधिकारी), गणेश तिडके (सहाय्यक कार्यक्रम अधिकारी) आणि गजानन कडूळे (क्लर्क-कम-डेटा एन्ट्री ऑपरेटर).
यावेळी गटविकास अधिकारी मुकेशजी माहोर यांनी सर्व सत्कारार्थींचे अभिनंदन केले. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यातही निष्ठेने आणि उत्कृष्ट पद्धतीने कार्य करत राहण्याचे आवाहन त्यांनी केले. या गौरव सोहळ्यास पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

