Mahabreaking

[breaking_news]

Rain stayed : शेंगा भरण्याच्या अवस्थेत पावसाने पाठ फिरवली; सोयाबीन उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात

Rain stayed : मृग नक्षत्रापासून दमदार पावसाने सुरुवात झाल्याने यंदाचा खरीप हंगाम चांगला होईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने अचानक दांडी मारल्याने हिवराखुर्द व परिसरातील शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. सोयाबीन पीक सध्या शेंगा भरण्याच्या महत्त्वपूर्ण अवस्थेत असताना पावसाने पाठ फिरवल्याने अनेक ठिकाणी पिके सुकण्याच्या व करपण्याच्या स्थितीत आली आहेत. त्यातच सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव कायम असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.दरम्यान, जानेफळ परिसरात 4 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी पावसाच्या सरी आल्या. तर हिवरा खुर्दमध्ये मात्र पावसाने हुलकावणी दिली.

Rain stayed

  पिके सुकण्याची भीती, उत्पादन घटण्याची चिंता; पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाईची मागणी

विष्णू वाकळे 

हिवराखुर्द : मृग नक्षत्रापासून दमदार पावसाने सुरुवात झाल्याने यंदाचा खरीप हंगाम चांगला होईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने अचानक दांडी मारल्याने हिवराखुर्द व परिसरातील शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. सोयाबीन पीक सध्या शेंगा भरण्याच्या महत्त्वपूर्ण अवस्थेत असताना पावसाने पाठ फिरवल्याने अनेक ठिकाणी पिके सुकण्याच्या व करपण्याच्या स्थितीत आली आहेत. त्यातच सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव कायम असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.दरम्यान, जानेफळ परिसरात 4 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी पावसाच्या सरी आल्या. तर हिवरा खुर्दमध्ये मात्र पावसाने हुलकावणी दिली.

Rain stayed

यंदा हंगामाच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने सोयाबीनसह विविध खरीप पिकांची पेरणी केली. मशागत, पेरणी, बियाणे, खते, कीटकनाशके आणि फवारणी यावर मोठा खर्च करण्यात आला. मात्र, आता पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत आले असताना पावसाचा खंड पडल्याने वर्षभराची मेहनत आणि केलेला खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

अळीचा प्रादुर्भाव कायम

एकीकडे पावसाअभावी पिकांना पाण्याची नितांत गरज निर्माण झाली असताना दुसरीकडे सोयाबीनवर विविध अळींचा प्रादुर्भाव कायम आहे. अळीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना वारंवार महागड्या कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली असून, वाढत्या खर्चाचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

Rain stayed

सिंचनाची सुविधा नसल्याने हतबलता

हिवराखुर्द परिसरातील बहुतांश शेतकरी पावसाच्या पाण्यावरच खरीप हंगामातील पिके घेतात. अनेक शेतकऱ्यांकडे सिंचनाची पुरेशी सुविधा नसल्याने पावसाने ओढ दिल्यास पिकांना पर्यायी पाणी देणे शक्य होत नाही. विहिरी आणि बोअरवेलमध्येही पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.

पंचनामे करून नुकसानभरपाईची मागणी

पावसाच्या दीर्घ खंडामुळे ज्या शेतांमध्ये सोयाबीनसह अन्य खरीप पिकांचे नुकसान झाले आहे, त्या नुकसानीचे कृषी विभाग व महसूल प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. मशागत, पेरणी, बियाणे, खते, कीटकनाशके आणि फवारणीवर झालेला मोठा खर्च वाया जाण्याची शक्यता असल्याने शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दमदार पावसाची प्रतीक्षा

आगामी दोन-तीन दिवसांत दमदार पाऊस न झाल्यास शेंगा भरण्याच्या अवस्थेतील सोयाबीनच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. उत्पादनात घट झाल्यास शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी आणखी वाढण्याची भीती आहे. त्यामुळे प्रशासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने पिकांची पाहणी करावी, आवश्यक मार्गदर्शन करावे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या निकषांनुसार मदत मिळवून द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top