Mahabreaking

[breaking_news]

Raid on gambling :सातेफळ रोडवरील चिकूच्या मळ्यात जुगार अड्ड्यावर छापा; तिघांवर कारवाई 

Raid on gambling : सातेफळ रोडवरील चिकूच्या मळ्यात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर देऊळगाव राजा पोलिसांनी छापा टाकून तिघांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कम व ताशपत्त्यांसह एकूण १ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Raid

ताशपत्त्यांवर रंगला जुगार; पोलिसांनी टाकला छापा, १२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

गजानन तिडके

देऊळगाव राजा : सातेफळ रोडवरील चिकूच्या मळ्यात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर देऊळगाव राजा पोलिसांनी छापा टाकून तिघांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कम व ताशपत्त्यांसह एकूण १ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजताच्या सुमारास सातेफळ रोडवरील चिकूच्या मळ्यात काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पंचांसमक्ष संबंधित ठिकाणी छापा टाकला.

या कारवाईत सोहेल शहा उस्मान शहा (वय २४, रा. समता कॉलनी, देऊळगाव राजा), कृष्णा खंडू बनकर (वय २९, रा. सातेफळ, ता. जाफराबाद, जि. जालना) आणि शेख नौशाद शेख रफिक (वय २६, रा. लोणार गल्ली, देऊळगाव राजा) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी केलेल्या अंगझडतीत सोहेल शहा याच्याकडून २५० रुपये, कृष्णा बनकर याच्याकडून ३०० रुपये तसेच शेख नौशाद याच्याकडून ३५० रुपये रोख रक्कम मिळाली. याशिवाय जुगाराच्या डावावर ३०० रुपये रोख रक्कम व ५२ ताशपत्ते असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १ हजार २०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नितीन मिंड, पोलीस ठाणे देऊळगाव राजा यांच्या फिर्यादीवरून कायमी अप नं. ३९६/२०२६ नुसार महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याची नोंद पोहेकॉ विनोद गवई यांनी केली असून, पुढील तपास पोहेका संजय गोरे करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top