Rafiquddin Saudagar: पातूर नगर परिषदेच्या नामनिर्देशित सदस्यपदासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत विकास योद्धा मंच आघाडीकडून शिफारस करण्यात आलेले रफिकउद्दीन सौदागर (एम.ए., बी.एड., एलएल.बी.) यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे विविध स्तरांतून स्वागत होत असून सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

विकास योद्धा मंच आघाडीची शिफारस; सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल
निशांत गवई
पातूर : पातूर नगर परिषदेच्या नामनिर्देशित सदस्यपदासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत विकास योद्धा मंच आघाडीकडून शिफारस करण्यात आलेले रफिकउद्दीन सौदागर (एम.ए., बी.एड., एलएल.बी.) यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे विविध स्तरांतून स्वागत होत असून सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

विकास योद्धा मंच आघाडीचे गटनेते सय्यद मुजम्मिल हुसेन यांच्या नेतृत्वाखाली आघाडीच्या आठ नगरसेवकांनी रफिकउद्दीन सौदागर यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यानुसार झालेल्या अधिकृत प्रक्रियेनंतर त्यांच्या नावास मंजुरी देण्यात आली.
रफिकउद्दीन सौदागर हे शहाबाबू एज्युकेशन सोसायटी, पातूरचे कोषाध्यक्ष असून शहाबाबू हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शिक्षण, समाजसेवा आणि सार्वजनिक क्षेत्रातील त्यांच्या सातत्यपूर्ण योगदानाची दखल घेत त्यांची नामनिर्देशित सदस्यपदी निवड करण्यात आल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
निवडीनंतर बोलताना रफिकउद्दीन सौदागर यांनी आपल्या निवडीचे श्रेय शहाबाबू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हाजी सय्यद बुरहान, सचिव हाजी सय्यद इसहाक राही तसेच पातूर शहरातील जनतेला दिले. विकास योद्धा मंच आघाडीच्या आठ नगरसेवकांना जनतेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले.
याशिवाय, आपल्या नावावर विश्वास दाखवून नामनिर्देशनासाठी शिफारस करणारे गटनेते सय्यद मुजम्मिल हुसेन तसेच विकास योद्धा मंच आघाडीच्या सर्व नगरसेवकांचे त्यांनी विशेष आभार व्यक्त केले. नगर परिषदेच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनहिताच्या प्रश्नांना प्राधान्य देत प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
रफिकउद्दीन सौदागर यांच्या निवडीबद्दल पातूर परिसरातील विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

