Mahabreaking

[breaking_news]

Queues for diesel :साखरखेर्डा येथील पेट्रोल पंपावर डिझेलसाठी रांगा; वाहनासोबतच ड्रम, कॅन लाईनमध्ये

Queues for diesel : गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण देशात इंधन टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे . सर्वाधिक फटका शेतीमध्ये काम करणाऱ्या ट्रॅंक्टर चालकांना बसला आहे. आज प्रत्येक पंपावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. साखरखेर्डा येथील एका पेट्रोल पंपावर डिझेल भरण्याच्या कारणावरून मोहाडी येथील सरपंचास मारहाण केल्याची घटना घडली आहे .

Queues for diesel

 साखरखेर्डा येथील पेट्रोल पंपावर राडा, तक्रार दाखल

अशोक इंगळे

साखरखेर्डा : गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण देशात इंधन टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे . सर्वाधिक फटका शेतीमध्ये काम करणाऱ्या ट्रॅंक्टर चालकांना बसला आहे. आज प्रत्येक पंपावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. साखरखेर्डा येथील एका पेट्रोल पंपावर डिझेल भरण्याच्या कारणावरून मोहाडी येथील सरपंचास मारहाण केल्याची घटना घडली आहे .

साखरखेर्डा येथे दोन पेट्रोल पंप असून चार दिवसानंतर पेट्रोल व डिझेलचे टँकर येते. ३ हजार लिटर पेट्रोल आणि ९ हजार लिटर डिझेल उपलब्ध होते . काही तासातच इंधन संपल्याचा फलक लावण्यात येतो . आणि असंख्य वाहन धारकांना रिकाम्या हाताने परतावे लागते . आज दुपारी दोन्ही पेट्रोल पंपावर फेरफटका मारला असता दोन्ही पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या . डिझेल आणि पेट्रोल केंव्हा येईल याची वेळ वाहन धारकांना माहित नाही , परंतु ते आल्यानंतर आपल्याला मिळायला पाहिजे अशी अपेक्षा असते . सकाळी १० वाजता पाटील ब्रदर्स पेट्रोल पंपावर डिझेल आणि पेट्रोल आले असता वाहनांच्या संख्येत वाढ झाली . काही ठिकाणी कॅन आणि ड्रम ठेवलेले होते . परंतू पाटील यांच्या पंपावर वाहनाशिवाय इतर साठवून ठेवण्यासाठी ड्रम कॅन मध्ये इंधन मिळत नाही . तोच नियम ओंकार पेट्रोल पंपावर आहे . तरीही आज ड्रम आणि कॅनांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली .

इंधन तुटवड्यामुळे शेतीची कामे रखडली

मार्च , एप्रिल महिन्यात रब्बी हंगामातील पिकांची काढणीसाठी झाली . आता मे महिन्यात शेतीची मशागतीची कामे वेगात सुरू आहे . नांगरणी , वखरपाळी ही कामे वेळेत केली तरच होतात . त्याअनुषंगाने ट्रॅंक्टर पालकांसोबत संपर्क साधून शेतकरी आपली कामे करीत आहेत . आज फक्त डिझेल द्या बाकी पैसे नंतर द्या तरच शेतात येऊन नागाटी करतो . अशी अट ट्रॅंक्टर चालकांची असल्याने पेट्रोल पंपावर कॅन आणि ड्रमची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे . याला पेट्रोल पंप चालक कंटाळले आहेत . शासनाने सक्त ताकीद देऊन फक्त वाहनांमध्ये इंधन देण्याचे आदेश पारित केले आहे . त्यामुळे दोन दिवसांपासून पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत . हे विदारक चित्र पाहायला मिळत आहे . आतातर पोलिस बंदोबस्तात डिझेल आणि पेट्रोल मिळणार असल्याने अनेकांची कोंडी होणार आहे .

दोन दिवसांपूर्वी साखरखेर्डा येथील पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी लागलेल्या रांगेतील वाहनाला ओव्हरटेक करून समोर वाहन लावण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली . त्यानंतर मोहाडी येथील सरपंच बबन काळे यांनी पोलीस स्टेशन मध्ये तंक्रार दाखल केली . नेहमी प्रमाणे त्यांचीही तंक्रार चौकशीवर ठेवून ठाणेदार गजानन करेवाड यांनी गुन्हा दाखल केला नाही . मलकापूर पांग्रा , साखरखेर्डा येथे काही गालगुंड राडा घालत असताना पोलिस त्यांच्यावर कारवाई का करीत नाही . यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते .

 

पेट्रोल पंपावर काल रात्री पासूनच वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. आवक कमी झाल्याने प्रत्येकाला पेट्रोल व डिझेल मिळेल अशी अपेक्षा ठेवून वाटप करण्यात येणार आहे .

अरविंद बेंदाडे , रविंद्र पाटील

पेट्रोल पंप चालक , साखरखेर्डा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top