Mahabreaking

[breaking_news]

Cargo Vehicle Collides :मालवाहु वाहनाची दुचाकीस धडक, एक ठार, एक गंभीर  

Cargo Vehicle Collides : भरधाव मालवाहु आणि दुचाकीची धडक झाल्याने एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना मेहकर–मालेगाव राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर पोलीस ठाणे हद्दीतील पिंपरी सरहद्द परिसरात बुधवारी (दि. 20 मे) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून काही काळ महामार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली होती. राधेश्याम वामन इंगळे (वय 42) असे मृतक युवकाचे नाव आहे तर संतोष शिंदे (वय 40) हे गंभीर जखमी झाले आहेत. दोघेही मालेगाव तालुक्यातील तिवळी येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

Cargo Vehicle Collides

लग्नावरून परतताना काळाचा घाला; पिंपरी सरहद्दीत अपघात, रुग्णवाहिका उशीरा पोहचल्याचा आरोप

डोणगाव : भरधाव मालवाहु आणि दुचाकीची धडक झाल्याने एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना मेहकर–मालेगाव राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर पोलीस ठाणे हद्दीतील पिंपरी सरहद्द परिसरात बुधवारी (दि. 20 मे) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून काही काळ महामार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली होती. राधेश्याम वामन इंगळे (वय 42) असे मृतक युवकाचे नाव आहे तर संतोष शिंदे (वय 40) हे गंभीर जखमी झाले आहेत. दोघेही मालेगाव तालुक्यातील तिवळी येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राधेश्याम इंगळे आणि संतोष शिंदे हे मेहकर तालुक्यातील नागापूर येथे लग्न समारंभासाठी गेले होते. समारंभ आटोपून ते दुचाकी क्रमांक एमएच 37 यू 7031 ने आपल्या गावी परतत असताना पिंपरी सरहद्द परिसरात समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, राधेश्याम इंगळे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर संतोष शिंदे गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर पिकअप वाहन चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने 108 रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. मात्र अर्धा ते पाऊण तास उलटूनही रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला.

अखेर केनवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची 102 रुग्णवाहिका घटनास्थळी बोलावण्यात आली. रुग्णवाहिकेचे चालक तोफिक मिर्झा यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी संतोष शिंदे यांना उपचारासाठी वाशिम येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून फरार पिकअप चालकाचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top