Mahabreaking

[breaking_news]

ideals of the Constitution :संविधानाच्या विचारांचा जागर; पुण्यात पाचवे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात!

ideals of the Constitution : संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र राज्य, बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप, शिक्रापूर आणि द्वारकामाई महिला व बालकल्याण मागासवर्गीय विकास संस्था, त्रिवेणीनगर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाचवे वार्षिक स्नेहसंमेलन व गुणगौरव पुरस्कार सोहळा शनिवार, दिनांक १४ नोव्हेंबर २०२६ रोजी इंटरनॅशनल स्कूल, विश्रांतवाडी, टिंगरेनगर, पुणे येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

ideals

 महापुरुषांच्या विचारांना उजाळा, सामाजिक योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गुणगौरव!

पुणे : संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र राज्य, बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप, शिक्रापूर आणि द्वारकामाई महिला व बालकल्याण मागासवर्गीय विकास संस्था, त्रिवेणीनगर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाचवे वार्षिक स्नेहसंमेलन व गुणगौरव पुरस्कार सोहळा शनिवार, दिनांक १४ नोव्हेंबर २०२६ रोजी इंटरनॅशनल स्कूल, विश्रांतवाडी, टिंगरेनगर, पुणे येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

ideals

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी द्वारकामाई महिला व बालकल्याण मागासवर्गीय विकास संस्था, त्रिवेणीनगर, पुणेच्या संचालिका सरलाताई दामोदर ऊपरवाट होत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संविधान विश्लेषण समितीचे संस्थापक सदस्य मुकेश माणिक गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संविधान विश्लेषण समितीचे सदस्य सचिन रणखांबे (परभणी) आणि प्रियंका वंजारी (नागपूर) यांनी केले. तर विमलताई बाबुराव गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले.

ideals

या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून भारतीय संविधानातील विचारांचा प्रसार, महामानवांचे विचार, महापुरुषांचे कार्य आणि सामाजिक प्रबोधनाचा जागर करण्यात आला. तसेच समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्यात आला. गुणगौरव पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरविंद श्रीपती मस्के, अरविंद लिंबा जगताप, नामदेव खाडवे, वसुंधराताई भोसेकर, सुरेखाताई दांगडे, सुमंत शिंदे, हर्ष आनंद सोनवणे यांच्यासह सर्व जिल्हा प्रचारप्रमुख, संविधान विश्लेषक समितीचे सदस्य आणि कार्यकारिणी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. महाराष्ट्र राज्याच्या विविध भागांतून आलेल्या मान्यवरांसह नागरिकांचीही या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top