Program commemorating : मोहर्रमुल हरामच्या पवित्र निमित्ताने तंजीम फैजान-ए-नक्शबंदिया यांच्या वतीने खानकाह नक्शबंदिया, बाळापूर (जि. अकोला) येथे अज़मत-ए-पंजतन पाक व शोहदाए कर्बला यांच्या स्मरणार्थ दोन दिवसीय धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

अज़मत-ए-पंजतन पाक व शोहदाए कर्बला यांच्या स्मरणार्थ दोन दिवसीय धार्मिक आयोजन
बाळापूर : मोहर्रमुल हरामच्या पवित्र निमित्ताने तंजीम फैजान-ए-नक्शबंदिया यांच्या वतीने खानकाह नक्शबंदिया, बाळापूर (जि. अकोला) येथे अज़मत-ए-पंजतन पाक व शोहदाए कर्बला यांच्या स्मरणार्थ दोन दिवसीय धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम ९ व १० मोहर्रम १४४८ हिजरी, दिनांक २५ व २६ जून २०२६ (गुरुवार व शुक्रवार) रोजी ईशाच्या नमाजनंतर आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमास सूफी मिल्लत, पीर-ए-तरीकत हजरत सय्यद शाह इझहारुल इस्लाम तालिब नक्शबंदी कादरी साहेब (सज्जादानशीन, खानकाह नक्शबंदिया, बाळापूर) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
यावेळी आल-ए-रसूल, खतीब-ए-अहले सुन्नत तथा काएद-ए-बरार हजरत सय्यद शाह जहीरुल इस्लाम झकी मियाँ नक्शबंदी कादरी साहेब यांचे विशेष मार्गदर्शनपर भाषण होणार आहे. कार्यक्रमात हजरत इमाम हुसैन (र.अ.) यांच्या शिकवणी, कर्बल्यातील शहीदांचे बलिदान, तसेच मानवता, शांतता, त्याग आणि बंधुभावाचा संदेश यावर सविस्तर प्रकाश टाकण्यात येणार आहे.
मोहर्रमच्या पवित्र दिवसांच्या पार्श्वभूमीवर समाजात धार्मिक जागृती निर्माण करण्यासोबतच इमाम हुसैन (र.अ.) यांच्या जीवनातील आदर्श मूल्यांचे स्मरण करून देण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

महिलांसाठी स्वतंत्र व पडद्यामागील बसण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच कार्यक्रमास परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आध्यात्मिक मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नामनिर्देशित सज्जादानशीन सय्यद शाह मुंतखबुल इस्लाम अदनान मियाँ नक्शबंदी कादरी मुजद्ददी यांनी केले आहे.

