Mahabreaking

🔴 BREAKING
House Catches Fire :बाळापुरात घराला आग, साहित्य जळून खाक, गोरे कुटुुंबाचा संसार उघड्यावर  Health Department :जलकुंभात मृत वानर ; खिरपुरी येथे आरोग्य विभागाची घरोघरी पाहणी; पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले! Severe Water Scarcity in Lohara :लोहारा गावात भीषण पाणीटंचाई; भर उन्हात पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती Funds amounting :जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३७ कोटी १५ लाखांचा निधी मंजूर Vishwadip Padol  :अमेरिकेसोबत केलेल्या कृषी करार शेतकऱ्यांवर अन्याय करणारा- विश्वदिप पडोळ Self-Defense Training :बुलढाण्यात नारीशक्तीला मिळणार स्वसंरक्षणाचे धडे! House Catches Fire :बाळापुरात घराला आग, साहित्य जळून खाक, गोरे कुटुुंबाचा संसार उघड्यावर  Health Department :जलकुंभात मृत वानर ; खिरपुरी येथे आरोग्य विभागाची घरोघरी पाहणी; पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले! Severe Water Scarcity in Lohara :लोहारा गावात भीषण पाणीटंचाई; भर उन्हात पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती Funds amounting :जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३७ कोटी १५ लाखांचा निधी मंजूर Vishwadip Padol  :अमेरिकेसोबत केलेल्या कृषी करार शेतकऱ्यांवर अन्याय करणारा- विश्वदिप पडोळ Self-Defense Training :बुलढाण्यात नारीशक्तीला मिळणार स्वसंरक्षणाचे धडे!

Professor Hankare  : प्रा. हंकारे यांनी उलगडलेल्या ‘माय–बाप’च्या वेदना; अश्रूंचे बांध फुटले

Professor Hankare  :  आई आणि वडील आपल्यासाठी रक्ताचं पाणी करतात. मुला–मुलींच्या आयुष्यात आई–वडील हेच खरे देव आहेत. आई नऊ महिने प्रसववेदना सहन करून आपल्याला जन्म देते. आपल्यामुळे जर आई-वडिलांना कधी खाली मान घालावी लागली, तर आपले जगणेच व्यर्थ आहे. आई-वडिलांना समजून घ्या, त्यांना प्रेमाने मिठी मारा. आपल्याला सर्व ब्रँडेड सोयी देणारा बाप स्वतः फाटके बनियन घालतो. तो झोपल्यानंतर त्याच्याकडे पाहा—तो कुणासमोर रडत नाही, कारण त्याला सगळ्यांची काळजी घ्यायची असते. अशा त्या बापाला समजून घ्या, असे भावनिक आवाहन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते डॉ. वसंत हंकारे यांनी केले.

Professor Hankare
“हं लय अवघड हाय गड्या, उमगाया बाप…” — हंबरडा फोडत मुलींनी बापांना कवटाळले

रुपाली राऊत 
मेहकर : आई आणि वडील आपल्यासाठी रक्ताचं पाणी करतात. मुला–मुलींच्या आयुष्यात आई–वडील हेच खरे देव आहेत. आई नऊ महिने प्रसववेदना सहन करून आपल्याला जन्म देते. आपल्यामुळे जर आई-वडिलांना कधी खाली मान घालावी लागली, तर आपले जगणेच व्यर्थ आहे. आई-वडिलांना समजून घ्या, त्यांना प्रेमाने मिठी मारा. आपल्याला सर्व ब्रँडेड सोयी देणारा बाप स्वतः फाटके बनियन घालतो. तो झोपल्यानंतर त्याच्याकडे पाहा—तो कुणासमोर रडत नाही, कारण त्याला सगळ्यांची काळजी घ्यायची असते. अशा त्या बापाला समजून घ्या, असे भावनिक आवाहन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते डॉ. वसंत हंकारे यांनी केले.
ते जानेफळ (ता. मेहकर) येथील श्री सरस्वती विद्यालयाच्या प्रांगणात स्व. विश्वनाथ तोंडे गुरुजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित व्याख्यानात बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन अंबिका महिला अर्बनचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते मोहन जीवनराव धोटे, संचालक संतोषराव तोंडे आणि सरस्वती परिवार, जानेफळ (दे. साकरशा) यांच्या वतीने करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा सौ. विजयाताई शरदअप्पा मिटकरी होत्या. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. वसंत हंकारे, तर प्रमुख अतिथी म्हणून सत्यजित परिवाराचे अध्यक्ष श्यामभाऊ उमाळकर, माजी उपशिक्षण अधिकारी परमेश्वर क्षीरसागर (बुलढाणा), रुपालीताई वडणकर (सरपंच, जानेफळ), माजी सरपंच गजाननतात्या कृपाळ, अष्टविनायक परिवाराचे अध्यक्ष डॉ. धनराज राठी, जिजामाता परिवार (हिवरा खुर्द) चे माधवराव आरसोडे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कैलासभाऊ पैठणकर (हिवरा खुर्द), माजी उपकार्यकारी अभियंता गणेशराव करवंदे, समन्वय समिती अध्यक्ष चंदूकाका गट्टाणी, सत्र न्यायालयाचे अधीक्षक रामजी सपकाळ (बुलढाणा), आ. पा. पाटील संस्थेचे अध्यक्ष राजूभाऊ रहाटे (शेंदला), माजी ए. सो. चे अध्यक्ष संतोषराव डोमळे व शाळा समिती अध्यक्ष दिनूभाऊ मिटकरी आदी मान्यवर उपस्थित होते.
मुलींच्या लेझीम पथकासह वाजत-गाजत मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव श्यामभाऊ गट्टाणी यांनी केले. त्यांनी स्व. तोंडे गुरुजी यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला. त्यानंतर श्यामभाऊ उमाळकर यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून उपस्थितांची मने जिंकली. पुढे प्रा. डॉ. म्हस्के यांनी वक्त्यांना स्वलिखित पुस्तके भेट दिली.
राज्यस्तरीय प्रतिनिधित्वासाठी क्रमांक लागल्याबद्दल वरिष्ठ लिपिक बसवेश्वर आखाडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
मुख्य वक्ते प्रा. डॉ. हंकारे यांनी व्याख्यानाची सुरुवात हलक्या-फुलक्या विनोदांनी केली. हळूहळू त्यांनी आपल्या धारदार शब्दांनी आणि अमोघ वाणीतून आई–वडिलांचे महत्त्व उलगडत श्रोत्यांच्या मनावर गारूड केले. पाहता पाहता सभागृहात अश्रूंच्या धारा लागल्या. अनेक मुलींनी हंबरडा फोडला. “आई–वडील आपल्यासाठी जीवाचं रान करतात आणि आपणच कधी त्यांचा अपमान करतो. जोपर्यंत बाप घरात आहे, तोपर्यंत त्याच्यावर जीव लावा. एकदा आई–वडील निघून गेले की जगात कोणीच कोणाचं राहत नाही,” या शब्दांनी संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले.
कार्यक्रमाच्या शेवटी अनेक मुलींनी हंबरडा फोडत आपल्या वडिलांना मिठी मारली. सर्व उपस्थित भावनिक झाले होते. अशा या अभूतपूर्व कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल डॉ. हंकारे यांनी मोहन धोटे पाटील, डॉ. कृष्णा हावरे, संतोषराव तोंडे, संचालक मंडळ व सर्व शिक्षकांचे भरभरून कौतुक केले.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन डॉ. कृष्णा हावरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संस्थेचे कोषाध्यक्ष श्यामभाऊ मुंदडा यांनी केले. उपस्थित पालक व विद्यार्थ्यांसाठी सरस्वती शिक्षण समितीच्या वतीने फराळाची व्यवस्था करण्यात आली होती, याबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले. मोहन धोटे पाटील यांच्या प्रगल्भ सामाजिक जाणिवेबद्दल सुज्ञ नागरिकांत मोठी चर्चा रंगली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरस्वती परिवार, जानेफळ (दे. साकरशा) येथील प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. या अभूतपूर्व कार्यक्रमाच्या व्हिडिओ क्लिप्स मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर स्टेटस स्वरूपात झळकत होत्या, हे विशेष.

Professor Hankare
इंडियन रेड क्रॉस सोसायटीतर्फे पल्स ऑक्सिमीटरचे वाटप
जानेफळ, देऊळगाव साकरशा व हिवरा खुर्द येथील दहा शाळांना इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या वतीने पल्स ऑक्सिमीटरचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते प्रा. वसंत हंकारे व अमर राऊत (जिल्हा कार्यकारिणी सदस्य, इंडियन रेड क्रॉस सोसायटी, बुलढाणा) यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. यावेळी मोहन भैया धोटे, संतोषराव तोंडे, प्रा. कृष्णा हावरे, सुरेश काठोळे, मंटू राजुरकर, विशाल फितवे, सतीश मुरडकर, उमेश सदावर्ते यांच्यासह संबंधित शाळांचे प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top