Mahabreaking

🔴 BREAKING
Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला

illegal sand stockpiling case :डोणगावातील अवैध रेती साठ्याप्रकरणी एक लाख 41 हजारांचा दंड

illegal sand stockpiling case : येथे दि. १९ डिसेंबर रोजी महसूल विभागाने धाड टाकून रेतीचा साठा जप्त केला होता. या प्रकरणी मेहकर तहसीलदारांनी रेतीसाठा असलेल्या प्लाट मालकाला एक लाख 41 हजार रुपयांचा दंड ठोठावला.

illegal sand stockpiling case

मेहकर तहसीलदारांची कारवाई : महसूल विभागाने धाड टाकून केला होता रेतीसाठा जप्त

डोणगाव :  येथे दि. १९ डिसेंबर रोजी महसूल विभागाने धाड टाकून रेतीचा साठा जप्त केला होता. या प्रकरणी मेहकर तहसीलदारांनी रेतीसाठा असलेल्या प्लाट मालकाला एक लाख 41 हजार रुपयांचा दंड ठोठावला.

  तक्रार प्राप्त झाल्यानंतर महसूल विभागाचे अधिकारी व ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी संत सेना महाराज मंदिराजवळील रेती साठ्यावर धाड टाकून पंचनामा केला होता. त्यानंतर संबंधित अहवाल तहसीलदार मेहकर यांच्याकडे सादर करण्यात आला. सदर प्रकरण ग्राम महसूल अधिकारी, डोणगाव (ता. मेहकर) यांच्या अहवालावरून सुरू करण्यात आले. अहवालानुसार, दिनांक १९/१२/२०२५ रोजी मौजे डोणगाव येथील संत सेना महाराज मंदिराजवळ सचिन रमेश खवाल यांच्या स्वतःच्या प्लॉटवर पंचासमक्ष पाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान नंदुरबार येथील जुनी २ ब्रास रेती आढळून आली. याबाबत रेती मालकाकडे विचारणा केली असता त्यांच्याकडे दिनांक ०८/११/२०२५ रोजीच्या २ ब्रास रेतीच्या पावत्या सादर करण्यात आल्या, असा अहवाल तहसीलदारांना प्राप्त झाला.

या प्रकरणात कार्यालयाचे पत्र क्र. कावि/म.स./प्रस्तु-१/१७७५/२०२५, दिनांक २४/१२/२०२५ अन्वये गैरअर्जदार सचिन रमेश खवाल यांना म्हणणे सादर करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली. प्रकरणातील पंचनामा व दाखल रॉयल्टी पावत्यांचे अवलोकन केले असता पंचनामा दिनांक १८/१२/२०२५ रोजी रात्री टाकण्यात आलेल्या रेतीचा असल्याचे निदर्शनास आले. मात्र सादर करण्यात आलेल्या पावत्या दिनांक ०८/१२/२०२५ च्या असल्याने सदर २ ब्रास रेती अवैध असल्याचे स्पष्ट झाले.

 निलेश मडके, तहसीलदार मेहकर यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८(७), तसेच महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग अध्यादेश क्र. १२ दिनांक १२ जून २०१५ व महाराष्ट्र शासन राजपत्र (असाधारण) भाग ४-ब, दिनांक १२ जानेवारी २०१८ मधील कलम ४८(८) आणि  अपर जिल्हाधिकारी, बुलढाणा यांचे पत्र क्र. कावि/कक्ष खनिकर्म/०१/२०२६, दिनांक ०१/०१/२०२६ नुसार गैरअर्जदार सचिन रमेश खवाल यांच्याविरुद्ध रु. १,४१,४००/- (अक्षरी एक लाख एकेचाळीस हजार चारशे रुपये) दंडाचा आदेश देण्यात केला आहे.

दरम्यान, डोणगाव येथे सध्या रात्री-अपरात्री सर्रासपणे अवैध गौणखनिज व रेती वाहतूक सुरू असून काही ठिकाणी परवानगीपेक्षा अधिक गौणखनिज साठवणूक केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. याकडे महसूल प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top