Private bus : डोणगाव ते मेहकर मार्गावर डोणगावजवळ १९ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. डोणगावकडून मेहकरच्या दिशेने जाणाऱ्या एका खासगी लक्झरी बसने (क्र. एमपी ७० झेडई ११२०) समोरून येणाऱ्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला.

धनश्री वेअर हाऊसजवळ भीषण अपघात; मोटारसायकलस्वार अकोल्यात उपचारासाठी दाखल
डोणगाव : डोणगाव ते मेहकर मार्गावर डोणगावजवळ १९ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. डोणगावकडून मेहकरच्या दिशेने जाणाऱ्या एका खासगी लक्झरी बसने (क्र. एमपी ७० झेडई ११२०) समोरून येणाऱ्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला.
इस्माईल शाह (रा. पिंप्री सरहद्द, जि. वाशिम) असे गंभीर जखमी झालेल्या मोटारसायकलस्वाराचे नाव आहे. १९ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास इस्माईल शाह हे मोटारसायकलने मेहकरहून डोणगावकडे येत होते. धनश्री वेअर हाऊसजवळ समोरून येणाऱ्या लक्झरी बसने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, इस्माईल शाह रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमी इस्माईल शाह यांना तातडीने मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले.
अपघातग्रस्त लक्झरी बस डोणगाव पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे. वृत्त लिहेपर्यंत या अपघातप्रकरणी डोणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता.

