Mahabreaking

[breaking_news]

Private Bus Catches Fire :समृद्धी महामार्गावर धावत्या खासगी बसने घेतला पेट ; 35 प्रवाशी बचावले  

Private Bus Catches Fire : भरधाव खासगी बसला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडॉरमध्ये 2 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता चॅनल क्रमांक 295.700 येथे घडली.  सुदैवाने मागून येणाऱ्या वाहनाच्या चालकाने वेळीच दिलेल्या इशाऱ्यामुळे मोठी दुर्घटना टळली असून ट्रॅव्हल्समधील 35 प्रवाशांचे प्राण वाचले.

Private Bus Catches Fire

मागील वाहनाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली; ट्रॅव्हल्स जळून खाक

 फकीरा पठाण

मलकापूर पांग्रा : भरधाव खासगी बसला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडॉरमध्ये 2 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता चॅनल क्रमांक 295.700 येथे घडली.  सुदैवाने मागून येणाऱ्या वाहनाच्या चालकाने वेळीच दिलेल्या इशाऱ्यामुळे मोठी दुर्घटना टळली असून ट्रॅव्हल्समधील 35 प्रवाशांचे प्राण वाचले.

सिनेस्टाईल पाठलाग करून पाच दरोडेखोरांना केले जेरबंद,एलसीबी,अंढेरा पोलिसांची संयुक्त कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच 28 एफ 3899 क्रमांकाची ट्रॅव्हल्स पुण्याहून पुसदकडे जात असताना अचानक वाहनाच्या मागील बाजूस आग लागली. ही बाब मागून येणाऱ्या वाहनचालकाच्या लक्षात आली आणि त्याने तत्काळ ट्रॅव्हल्स चालकाला याची माहिती दिली.

चालक आकाश जमदाडे (वय 32, रा. पुसद, जि. यवतमाळ) याने प्रसंगावधान राखत ट्रॅव्हल्स तात्काळ रस्त्याच्या कडेला उभी केली. त्यानंतर सर्व 35 प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले. त्यामुळे संभाव्य मोठी जीवितहानी टळली. दरम्यान, खाली उतरताना बबन कदम (वय 48, रा. पुसद) यांना खांद्याला किरकोळ दुखापत झाली. त्यांना शासकीय रुग्णवाहिकेद्वारे मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.आग इतकी भीषण होती की काही वेळातच संपूर्ण ट्रॅव्हल्स जळून खाक झाली. घटनेनंतर चालक व वाहक घटनास्थळावरून निघून गेल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच पीएसआय राऊत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यात एचसी गायकवाड, पीसी ढोले, इंगळे, चननकेशला आदींचा समावेश होता. पोलिसांनी घटनास्थळी बॅरिकेडिंग करून वाहतूक सुरळीत ठेवण्याचे काम केले.तसेच, प्रवाशांना पुढील प्रवासासाठी शासकीय वाहनाद्वारे मेहकर बसस्थानकापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली.या घटनेमुळे समृद्धी महामार्गावर काही काळ खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.

त्या अपघाताची पुनरावृत्ती टळली

समृद्धी महामार्गावर 30 जून ते 1 जुलै 2023च्या रात्री मध्यरात्री पिंपळखुटा गावाजवळ एका खासगी बसला आग लागल्याने 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. यावेळी सुदैवाने मागच्या वाहन चालकाला आग दिसल्याने त्याने खासगी बसच्या चालकाच्या ही बाब निदर्शनास आणली. त्यामुळे, 2023 मध्ये झालेल्या अपघाताची पुनरावृत्ती टळली.

खासगी बस चालकांकडून नियमांचे उल्लंघन

समृद्धी महामार्गावर 1 जुलै 2023 रोजी झालेल्या अपघानंतर प्रशासन सजग झाले होते. आरटीओ तसेच महामार्ग पालीसांनी विविध उपाय योजना केल्या होत्या. तसेच खासगी बस मालकांसाठी मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या होत्या. आता पुन्हा तशा उपाय योजना करण्याची गरज आहे. सध्या खासगी बस चालक आणि मालकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. मोठा अपघात घडल्यानंतर प्रशासन जागे होते. परंतु, खासगी बसेसची नियमीत तपासणी झाल्यास अपघात होण्यापूर्वीच रोखता येवू शकतो.

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top