Mahabreaking

[breaking_news]

Pravin Ajgar :डोणगावचे प्रविण अजगर ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित

Pravin Ajgar :येथील जिवन विकास कॉन्व्हेंटचे शिक्षक प्रविण अजगर यांना मानव अधिकार सुरक्षा फोरमच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा ‘आदर्श शिक्षक’ राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार २२ मार्च रोजी धुळे येथे आयोजित भव्य सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

Pravin Ajgar

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल;  धुळे येथे पुरस्कार सोहळा

डोणगाव : येथील जिवन विकास कॉन्व्हेंटचे शिक्षक प्रविण अजगर यांना मानव अधिकार सुरक्षा फोरमच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा ‘आदर्श शिक्षक’ राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार २२ मार्च रोजी धुळे येथे आयोजित भव्य सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद (एनएचआरपीसी) फोरममार्फत दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव केला जातो. महिला सक्षमीकरण, बालमजुरी प्रतिबंध, सामाजिक सुरक्षा आणि पोलीस-समाज समन्वय या क्षेत्रांत कार्यरत असलेली ही संस्था देशभरात विविध उपक्रम राबवित आहे.

याच अंतर्गत २०२६ च्या पुरस्कार सोहळ्यात ‘आदर्श शिक्षक’, ‘महिला रत्न’, ‘कृषी रत्न’ आणि ‘समाज भूषण’ असे विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यामध्ये शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत प्रविण अजगर यांची ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

पुरस्कार सोहळ्यात मानव अधिकार फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष गोरख दिलीप देवरे तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत अजगर यांचा सन्मान करण्यात आला.

प्रविण अजगर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून, त्यांच्या या यशामुळे डोणगाव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top