Pramod Ghode : पातूर नगरपरिषद संवर्ग अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या कार्यकारिणीची सभा शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी नगरपरिषद कार्यालयात उत्साहात पार पडली. या सभेत संघटनेच्या विविध पदांवर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी प्रमोद घोडे यांची निवड करण्यात आली.

पातूर नगरपरिषद कर्मचारी संघटनेची कार्यकारिणी जाहीर; प्रमोद घोडे अध्यक्ष, वेदेशसिंग ठाकूर सचिव
निशांत गवई
पातूर : पातूर नगरपरिषद संवर्ग अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या कार्यकारिणीची सभा शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी नगरपरिषद कार्यालयात उत्साहात पार पडली. या सभेत संघटनेच्या विविध पदांवर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी प्रमोद घोडे यांची निवड करण्यात आली.
संघटनेच्या उपाध्यक्षपदी सय्यद अशपाक सय्यद मुस्ताक, कोषाध्यक्षपदी श्रीकृष्ण शामराव पाटील, तर सचिवपदी वेदेशसिंग मनोहरसिंग ठाकूर यांची निवड करण्यात आली. तसेच जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी मुदस्सीर एजाज अब्दुल मतीन यांच्यावर सोपविण्यात आली.
या निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. संघटनेच्या माध्यमातून नगरपरिषद संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांना व अडचणींना योग्य व्यासपीठ मिळावे तसेच कर्मचारी हिताच्या बाबींवर संघटितपणे काम करता यावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
सभेस नगरपरिषदेचे कार्यालय अधीक्षक सुनील उगले, नगर अभियंता शरद काजळे, रचना सहायक पंकज जोपळे, संगणक अभियंता श्रीकृष्ण बबनराव जैवाळ, लेखापाल रामप्रसाद मस्के, वरिष्ठ लिपिक संतोष तेलंगडे, वरिष्ठ लिपिक विनोद माहुलीकर, वरिष्ठ लिपिक देवेंद्र ढोणे, कर संग्राहक सय्यद जावेद अंजान, सहायक ग्रंथपाल ईश्वर पेंढारकर, ऐनोद्दीन फायजोद्दीन, लिपिक सय्यद सादिक, उज्वल भरणे, आकाश बग्गन, सय्यद अख्तर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नवीन कार्यकारिणीच्या निवडीमुळे संघटनेच्या कामकाजाला अधिक गतिमानता मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत असून, कर्मचारी हिताचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघटना प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

