Mahabreaking

🔴 BREAKING
Robbery Gang Apprehended :लुटमार करणाऱ्या टोळीला अवघ्या ४८ तासात केले जेरबंद Jay Bajrang Vidyalaya :राज्यस्तरीय शालेय थ्रोबॉल स्पर्धेत जय बजरंग विद्यालय संघाला कांस्य पदक The election campaign :ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू ; नामनिर्देशन काळात तहसील कार्यालय परिसरात चोख बंदोबस्त The public relations process :शेवटच्या वक्तीपर्यंत माहिती पोहचवण्यासाठी जनसंपर्क प्रक्रीया अधिक प्रभावी करावी : आर. विमला Villagers aggressive :दुसरबीडमध्ये पाणी, गटारी व रस्त्यांच्या प्रश्नावर ग्रामस्थ आक्रमक Digambar Lokhande :जिल्हा परिषद शाळेमधूनच अधिकारी तयार होतात:   दिगंबर लोखंडे     Robbery Gang Apprehended :लुटमार करणाऱ्या टोळीला अवघ्या ४८ तासात केले जेरबंद Jay Bajrang Vidyalaya :राज्यस्तरीय शालेय थ्रोबॉल स्पर्धेत जय बजरंग विद्यालय संघाला कांस्य पदक The election campaign :ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू ; नामनिर्देशन काळात तहसील कार्यालय परिसरात चोख बंदोबस्त The public relations process :शेवटच्या वक्तीपर्यंत माहिती पोहचवण्यासाठी जनसंपर्क प्रक्रीया अधिक प्रभावी करावी : आर. विमला Villagers aggressive :दुसरबीडमध्ये पाणी, गटारी व रस्त्यांच्या प्रश्नावर ग्रामस्थ आक्रमक Digambar Lokhande :जिल्हा परिषद शाळेमधूनच अधिकारी तयार होतात:   दिगंबर लोखंडे    

Posts Sanctioned : नव्याने मंजूर झालेल्या कार्यालयांसाठी पदे मंजूर, बुलढाणा जिल्ह्यात नवीन कार्यालयांची निर्मिती

Posts Sanctioned : महसूल प्रशासनातील कामाचा वाढता व्याप आणि नागरिकांची सोय विचारात घेऊन राज्यात एक अपर जिल्हाधिकारी आणि तीन अपर तहसीलदार कार्यालये मंजूर करण्यात आली होती. आता या कार्यालयांसाठी नविन सुधारीत  आकृतीबंध मंजूर केला आहे.

Posts Sanctioned

अपर जिल्हाधिकारी आणि तीन अपर तहसीलदार कार्यालये होणार कार्यान्वीत

बुलढाणा: महसूल प्रशासनातील कामाचा वाढता व्याप आणि नागरिकांची सोय विचारात घेऊन जिल्ह्यात एक अपर जिल्हाधिकारी आणि तीन अपर तहसीलदार कार्यालये मंजूर करण्यात आली होती. आता या कार्यालयांसाठी नविन सुधारीत  आकृतीबंध मंजूर केला आहे. या निर्णयानुसार बुलढाणा जिल्ह्यासाठी नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालय आणि तीन नवीन अपर तहसीलदार कार्यालयांना मंजुरी देण्यात आली आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा, मेहकर तालुक्यातील डोनगाव आणि खामगाव तालुक्यातील लखनवाडा येथे ही नवीन अपर तहसीलदार कार्यालये (लहान गट) कार्यान्वित होणार आहेत.या कार्यालयांसाठी पदे मंजूर करण्यात आली आहेत.

या ऐतिहासिक निर्णयामुळे महसूल विभागातील मंजूर पदांचा सर्वंकष आढावा घेऊन एकूण ३४,५७६ नियमित आणि १,३०० बाह्यस्त्रोतामार्फत भरावयाच्या पदांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्याची गणना ‘मोठ्या जिल्ह्यांच्या’ श्रेणीत करण्यात आली असून, अशा जिल्ह्यांसाठी नियमित १५१ पदे आणि बाह्ययंत्रणेमार्फत ११ पदे मंजूर करण्यात आली आहेत. नवीन निर्माण होणाऱ्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयासाठी १३ नियमित पदे, तर नवीन लहान अपर तहसीलदार कार्यालयांसाठी प्रत्येकी ७ नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत.

नवीन कार्यालयांचे मुख्यालय आणि कार्यक्षेत्र निश्चित करताना लोकसंख्या, तालुक्यांची संख्या आणि भौगोलिक क्षेत्रफळ या निकषांचा विचार केला जाणार आहे. अपर तहसीलदार कार्यालयाचे कार्यक्षेत्र निश्चित करताना ‘मंडळ’ हा घटक महत्त्वाचा मानला असून, कोणत्याही एका मंडळाचे विभाजन दोन कार्यालयांत होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल. या नवीन रचनेमुळे महसूल प्रशासनाच्या कामात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून कामकाज अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे. नवीन कार्यालयांच्या निर्मितीमुळे जिल्ह्यातील नागरिकांना जमिनीचे दाखले, महसुली प्रकरणे आणि इतर शासकीय सेवांसाठी आता स्थानिक पातळीवरच सोय उपलब्ध होणार असून प्रशासकीय कामांना मोठी गती मिळणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top