The election campaign : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अकोला जिल्ह्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नामनिर्देशन प्रक्रिये दरम्यान सर्व तहसील कार्यालयांवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी याबाबत संबंधित पोलीस ठाण्यांना निर्देश जारी केले आहेत.

ज़ाकिर अहमद
बाळापुर : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अकोला जिल्ह्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नामनिर्देशन प्रक्रिये दरम्यान सर्व तहसील कार्यालयांवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी याबाबत संबंधित पोलीस ठाण्यांना निर्देश जारी केले आहेत.
प्राप्त माहितीनुसार अकोला, पातूर, मुर्तिजापूर, बार्शिटाकळी, अकोट, तेल्हारा व बाळापूर या तालुक्यांतील एकूण ७६ ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी २८ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार असून २९ एप्रिल रोजी मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार ७ ते १३ एप्रिल २०२६ दरम्यान उमेदवारांकडून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. त्यानंतर १५ एप्रिल रोजी अर्जांची छाननी, तर १७ एप्रिल हा अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस निश्चित करण्यात आला आहे. नामनिर्देशन प्रक्रियेच्या वेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. उमेदवार व त्यांच्या समर्थकांच्या मिरवणुका तहसील कार्यालयापासून १०० मीटर अंतरावरच थांबविण्यात येतील. तसेच १०० मीटरच्या आत फक्त तीन वाहने व उमेदवारासह कमाल पाच व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
अकोट, डाबकी रोड, अकोट ग्रामीण, तेल्हारा, हिवरखेड, दहीहांडा, बाळापूर, उरळ, पातूर, चान्नी, मुर्तिजापूर शहर, बोरगाव मंजू, माना, पिजर व बार्शिटाकळी या पोलीस ठाण्यांना आवश्यकतेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनीही आपल्या कार्यक्षेत्रातील पोलीस ठाण्यांना समन्वयाने मदत करून नामनिर्देशन काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

