Mahabreaking

[breaking_news]

  Jyoti Singare  :‘पोशिंदा’ कवितेने जिंकली रसिकांची मने; ज्योती सिनगारे यांना राज्यस्तरीय काव्य गौरव पुरस्कार

Jyoti Singare  : साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल देऊळगाव मही येथील प्रसिद्ध लेखिका, कवयित्री आणि समाजसेविका सौ. ज्योती सिनगारे (वायाळ) यांना मानाचा वृत्तसेवा साहित्य काव्य गौरव राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

  Jyoti Singare

   ग्रामीण वास्तव अन् सामाजिक जाणिवांना शब्दबद्ध करणाऱ्या ज्योती सिनगारे यांचा गौरव

गजानन तिडके

देऊळगाव राजा : साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल देऊळगाव मही येथील प्रसिद्ध लेखिका, कवयित्री आणि समाजसेविका सौ. ज्योती सिनगारे (वायाळ) यांना मानाचा वृत्तसेवा साहित्य काव्य गौरव राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

रानकवी प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित १००व्या मराठी काव्य संमेलनाच्या निमित्ताने ज्ञानाई फाउंडेशन कला साहित्य विचार मंच, पुणे यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे येथे आयोजित भव्य साहित्य संमेलनात पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला.

या सोहळ्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, उद्घाटक भाऊसाहेब भोईर, निवृत्ती अण्णा बादल, प्रा. डॉ. शैलेंद्र बनगे, प्रा. हनुमंत धालगडे, अभिनेत्री प्रीती पौळ, सिनेअभिनेते गुलाब राजा फुलमाळी आणि अभिनेत्री माया बोणे यांच्या हस्ते ज्योती सिनगारे यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि शाल प्रदान करून गौरविण्यात आले.

ग्रामीण वास्तवाला शब्दरूप

ज्योती सिनगारे यांनी आपल्या कविता, कथा आणि लेखनातून ग्रामीण भागातील वास्तव, महिलांच्या व्यथा तसेच विविध सामाजिक प्रश्न आणि सामाजिक जाणीवा प्रभावीपणे मांडल्या आहेत. त्यांच्या संवेदनशील आणि सामाजिक आशयाच्या साहित्याची दखल घेत त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

विशेषतः ‘पोशिंदा’ या त्यांच्या कवितेने रसिकांची मने जिंकली असून, शेतकरी आणि ग्रामीण जीवनातील वास्तवाचे प्रभावी चित्रण त्यांच्या लेखणीतून उमटते. साहित्याच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्या सातत्याने करीत आहेत.

बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

ज्योती सिनगारे यांना मिळालेल्या या राज्यस्तरीय सन्मानामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या साहित्य क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या काव्य संमेलनाचे मुख्य आयोजक कवी सुभाष सोनवणे, दत्तू ठोकळे, जगदीप वनशिव, लोककवी सिताराम नरके आणि राहुल जाधव यांनी शिस्तबद्ध पद्धतीने आयोजन केले होते. त्यांच्या नियोजनामुळे साहित्यिक आणि रसिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top