Mahabreaking

[breaking_news]

Police constable :पोक्सोसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेला पोलिस शिपाई नांदेडमधून जेरबंद

Police constable : पोक्सो कायद्यासह लैंगिक अत्याचार आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी असलेल्या पोलीस शिपाई पवन उध्वराव वडगावे याला अकोला पोलिसांनी तब्बल २० दिवसांच्या अथक शोधमोहीमेनंतर नांदेड जिल्ह्यातील मारताडा (ता. नायगाव) येथून ताब्यात घेतले. आरोपी हा बाळापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याने त्याला तपासाची माहिती होती. त्यामुळे त्याचा शोध घेणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले होते.

Police constable

 अकोला पोलिसांची २० दिवसांची शोधमोहीम यशस्वी:  हैदराबाद ते मुंबई शोधमोहीम

बाळापूर : पोक्सो कायद्यासह लैंगिक अत्याचार आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी असलेल्या पोलीस शिपाई पवन उध्वराव वडगावे याला अकोला पोलिसांनी तब्बल २० दिवसांच्या अथक शोधमोहीमेनंतर नांदेड जिल्ह्यातील मारताडा (ता. नायगाव) येथून ताब्यात घेतले. आरोपी हा बाळापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याने त्याला तपासाची माहिती होती. त्यामुळे त्याचा शोध घेणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जुलै २०२६ रोजी बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५०५/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम ६९, ६४, १०८ तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ४ व ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, बाळापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस शिपाई पवन वडगावे हा ज्या घरात भाड्याने राहत होता, त्या घरमालकाच्या मुलीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. त्याने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर लग्न करण्यास नकार दिल्याने संबंधित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर अवस्थेत उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. यानंतर पीडितेच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा नोंद होताच आरोपी पवन वडगावे हा मूळगावी नांदेड जिल्ह्यात सुट्टीवर गेला होता. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच त्याने फरार होऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पोलीस खात्यातील कर्मचारी असल्याने तपासाची पद्धत आणि तांत्रिक बाबींची माहिती असल्यामुळे त्याचा माग काढणे अधिक कठीण बनले होते.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर आणि बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे यांना आरोपीचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेची तीन आणि बाळापूर पोलीस ठाण्याची दोन अशा एकूण पाच पथकांसह सहा अधिकारी व २५ पोलीस अंमलदारांची विशेष शोधमोहीम राबविण्यात आली. या पथकांनी तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि आरोपीच्या नातेवाईक व मित्रांवर सतत नजर ठेवून शोधकार्य सुरू ठेवले.

शोधमोहीमेदरम्यान हैदराबाद (तेलंगणा), कोईम्बतूर (तामिळनाडू), बेंगळुरू (कर्नाटक), मुंबई, नांदेड आणि हिंगोली येथे आरोपीचा शोध घेण्यात आला. गेल्या दहा दिवसांपासून दोन पथके नांदेड तर दोन पथके मुंबई येथे तळ ठोकून होती. अखेर गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी पवन उध्वराव वडगावे (रा. नरसी, जि. नांदेड) याला मारताडा, ता. नायगाव, जि. नांदेड येथून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, बाळापूरचे पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल जाधव, पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण, शरद सैंदाणे तसेच बाळापूर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी आणि अंमलदारांनी या यशस्वी कारवाईत सहभाग घेतला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top