Mahabreaking

[breaking_news]

Pickpockets run rampant :संत मुक्ताबाई पालखी दर्शनावेळी खिसेकापूंचा धुमाकूळ; देऊळगाव महीत ६१ हजारांची रोकड लंपास

Pickpockets run rampant : संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांची मोठी गर्दी उसळलेली असताना देऊळगाव मही येथे खिसेकापूंचा डाव उघडकीस आला आहे. पालखी दर्शनासाठी बँकेतून बाहेर आलेल्या सहायक शाखा व्यवस्थापकासह तिघांच्या खिशातील एकूण ६१ हजार रुपयांची रोकड अनोळखी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना २ जुलै रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अज्ञात तीन इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pickpockets run rampant

पालखी सोहळ्यात चोरीची घटना; बँक अधिकाऱ्यासह तिघांच्या खिशावर डल्ला

गजानन तिडके 

देऊळगाव राजा : संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांची मोठी गर्दी उसळलेली असताना देऊळगाव मही येथे खिसेकापूंचा डाव उघडकीस आला आहे. पालखी दर्शनासाठी बँकेतून बाहेर आलेल्या सहायक शाखा व्यवस्थापकासह तिघांच्या खिशातील एकूण ६१ हजार रुपयांची रोकड अनोळखी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना २ जुलै रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अज्ञात तीन इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय रामकिसन शिंगणे (वय ३३), रा. देऊळगाव मही, ता. देऊळगाव राजा हे बुलढाणा अर्बन बँकेच्या शाखेत सहायक शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. २ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४.४० वाजताच्या सुमारास ते संत मुक्ताबाई पालखीचे दर्शन घेण्यासाठी बँकेतून बाहेर येऊन पालखीसमोर गेले होते. यावेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खिशातील ४६ हजार ५०० रुपयांची रोकड चोरून नेली.

याच वेळी देऊळगाव मही येथील भरत ज्ञानदेव शिंगणे यांच्या खिशातील ९ हजार ५०० रुपये, तसेच प्रशांत ज्ञानबा शिंगणे यांच्या खिशातील ५ हजार रुपयेही अज्ञात इसमांनी लंपास केल्याचे समोर आले आहे. या तिन्ही घटनांमध्ये एकूण ६१ हजार रुपयांची रोकड चोरीस गेली आहे.

या प्रकरणी संजय रामकिसन शिंगणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अप. क्र. ३०६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत अज्ञात तीन इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा ५ जुलै रोजी दुपारी ३.५८ वाजता नोंदविण्यात आला.

सदर गुन्ह्याची नोंद पोलीस हेडकॉन्स्टेबल भास्कर सानप यांनी केली असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कलीम देशमुख करीत आहेत. पालखी सोहळ्यातील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी हातचलाखीने ही चोरी केल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, परिसरातील हालचाली, उपलब्ध माहिती आणि साक्षीदारांच्या आधारे पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

पालखी सोहळ्यासारख्या धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असल्याने अशा ठिकाणी खिसेकापू व चोरट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top