illegal transport of cattle : पातूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंश जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई करत एका आरोपीला ताब्यात घेतले. या कारवाईत तीन गोवंश जनावरे आणि बोलेरो पिकअप वाहन असा एकूण ६ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ऑपरेशन ‘प्रहार’ अंतर्गत पातूर पोलिसांची कारवाई; बोलेरोसह तीन गोवंश जनावरे जप्त
निशांत गवई
पातूर : पातूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंश जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई करत एका आरोपीला ताब्यात घेतले. या कारवाईत तीन गोवंश जनावरे आणि बोलेरो पिकअप वाहन असा एकूण ६ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. बोलेरो पिकअप (क्र. MH-30-AB-2891) मधून तीन गोवंश जनावरे क्रूरतेने कोंबून अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी शेख फय्याज शेख हय्यात (वय ३०, रा. मुजावरपुरा, ता. पातूर, जि. अकोला) तसेच वाहन मालक शेख वाजीद शेख राजिक (रा. मुजावरपुरा, ता. पातूर, जि. अकोला) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२५ तसेच प्राणी संरक्षण अधिनियम, १९६० मधील कलम ५, ५-अ, ५-ब, ९ आणि ११(१)(ल) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत अंदाजे ६ लाख रुपये किमतीचे बोलेरो पिकअप वाहन आणि ७० हजार रुपये किमतीची तीन गोवंश जनावरे असा एकूण ६ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक लेव्हरकर तसेच पातूरचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक मेश्राम, पोलीस उपनिरीक्षक गोसावी, पोलीस कॉन्स्टेबल सांगळे, रोशन, साई आणि नितीन यांनी सहभाग घेतला.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

