Mahabreaking

[breaking_news]

Paramahansa Shri Tejaswi Maharaj’s : परमहंस श्री तेजस्वी महाराज यांची प्रकृती चिंताजनक

Paramahansa Shri Tejaswi Maharaj’s : नुकताच २८ नोव्हेंबर रोजी तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरोडी येथे परमहंस श्री तेजस्वी महाराज यांचा ९० वा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. मात्र, महाराज श्रींची तब्येत बिघडली असून प्रकृती चिंताजनक आहे.

Paramahansa Shri Tejaswi Maharaj's
साखरखेर्डा : नुकताच २८ नोव्हेंबर रोजी तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरोडी येथे परमहंस श्री तेजस्वी महाराज यांचा ९० वा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. मात्र, महाराज श्रींची तब्येत बिघडली असून प्रकृती चिंताजनक आहे. ही वार्ता वाऱ्यासारखी परिसरात पसरताच हजारो भाविक महाराज श्रींचे मुखदर्शन घेण्यासाठी वरोडी येथे दाखल झाले. महाराजांविषयीची भावनिक आत्मीयता आणि श्रद्धा यामुळे अनेकांच्या डोळ्यांत पाणी तरळले. भजनी मंडळी जागर करून महाराजांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी प्रार्थना करत आहेत.

वरोडी येथील परमहंस श्री तेजस्वी महाराज यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती संस्थानतर्फे सोशल मीडियावर देण्यात आली. ही माहिती साखरखेर्डा, मेहकर, चिखली, लोणार तालुक्यातील अनेक गावांमध्ये वेगाने पसरली. तेजस्वी बाबांच्या प्रकृतीबाबत सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. मिळेल त्या वाहनाने भाविक वरोडी येथे दाखल होत आहेत. दुपारी हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. महाराज श्रींना दीर्घायुष्य लाभावे यासाठी भजनाच्या माध्यमातून जागर सुरू आहे.

काही वेळाने महाराज श्रींनी उठून भक्तांना दर्शन दिले. महाराज उठताच अनेकांच्या डोळ्यांत पुन्हा पाणी तरळले आणि ‘माऊली, माऊली’ असा एकच जयघोष सुरू झाला. दुपारच्या वेळेत संपूर्ण वरोडी गावातील नागरिक संस्थानात दाखल होऊन माऊलीचे मुखदर्शन घेण्यासाठी वारीत सहभागी झाले.

परमहंस श्री तेजस्वी महाराज यांचा ९० वा जन्मोत्सव २८ नोव्हेंबर रोजी लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा झाला होता. केवळ पाच दिवस उलटत नाहीत तोच प्रकृती चिंताजनक असल्याची वार्ता समजताच अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले. माऊलीचे दर्शन व्हावे, यासाठी हजारो भाविकांची पावले वरोडीच्या दिशेने पडू लागली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top