Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Sanjay Raimulkar :लोणार येथे पॅराग्लायडिंगची सुरुवात; पर्यटनवाढीस चालना – संजय रायमुलकर

Sanjay Raimulkar : चिखलदरा येथे पॅराग्लायडिंग सुरू झाल्यानंतर पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून त्याच धर्तीवर लोणार सरोवर येथेही ही सुविधा उपलब्ध झाल्यास जागतिक कीर्तीच्या या पर्यटनस्थळाला मोठी चालना मिळेल, असे मत माजी आमदार संजय रायमुलकर यांनी व्यक्त केले.

Sanjay Raimulkar

मेहकर : चिखलदरा येथे पॅराग्लायडिंग सुरू झाल्यानंतर पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून त्याच धर्तीवर लोणार सरोवर येथेही ही सुविधा उपलब्ध झाल्यास जागतिक कीर्तीच्या या पर्यटनस्थळाला मोठी चालना मिळेल, असे मत माजी आमदार संजय रायमुलकर यांनी व्यक्त केले.

महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर लोणार येथे सचिन कापुरे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारातून ‘गीताम स्पोर्ट्स पॅरामोटरिंग अॅडव्हेंचर क्लब’चा शुभारंभ माजी आमदार रायमुलकर यांच्या हस्ते विधिवत करण्यात आला. यावेळी पॅराग्लायडिंग उपक्रमाचा प्रारंभ नारळ फोडून करण्यात आला. गजानन खरात यांनी प्रास्ताविकातून प्रकल्पाची माहिती दिली.

या प्रसंगी बोलताना रायमुलकर म्हणाले की, लोणार सरोवर हे अ दर्जाचे जागतिक पर्यटनकेंद्र असून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात आले आहेत. पर्यटन, वन, पुरातत्त्व व महसूल विभागांशी संबंधित काही जटिल प्रश्नांमुळे विकासकामांना अपेक्षित गती मिळू शकली नाही; मात्र न्यायालयीन समितीच्या निर्देशांनुसार सध्या कामे सुरू आहेत. सचिन कापुरे, जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी लोणारचे पर्यटनमूल्य वाढविण्यासाठी उचललेले पाऊल स्वागतार्ह असून स्थानिक नागरिक व पर्यटकांना आता पॅराग्लायडिंगचा रोमांचक अनुभव घेता येणार आहे, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी ज्येष्ठ नेते प्रकाश मापारी, नगराध्यक्ष भूषण मापारी, शिवसेना तालुकाप्रमुख भगवानराव सुलताने, अशोक वारे, रामदास कापुरे, अॅड. शिवाजी सानप, प्रा. विठ्ठल भानुसे, पॅराग्लायडिंग तज्ज्ञ आशिष तोमर, डॉ. भास्कर मापारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top