PAHEL Offers : वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी PAHEL Institute ने “FREE Re-NEET Support” उपक्रमाची घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत आत्मविश्वास गमावू नये आणि नव्या जोमाने तयारी सुरू ठेवावी, या उद्देशाने संस्थेकडून विविध मोफत शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.पेपर फुटीमुळे नीटची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे, विद्यार्थी मानसिक तणावात आहेत. पहेलच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी PAHEL Instituteचा पुढाकार ; FREE Re-NEET Support सुरू
बुलढाणा : वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी PAHEL Institute ने “FREE Re-NEET Support” उपक्रमाची घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत आत्मविश्वास गमावू नये आणि नव्या जोमाने तयारी सुरू ठेवावी, या उद्देशाने संस्थेकडून विविध मोफत शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.पेपर फुटीमुळे नीटची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे, विद्यार्थी मानसिक तणावात आहेत. पहेलच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
संस्थेच्या माहितीनुसार, री-NEETची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत मॉक टेस्ट, डाऊट सोल्विंग, सविस्तर उत्तरपत्रिका विश्लेषण तसेच अनुभवी शिक्षकांकडून मार्गदर्शन दिले जाणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांचा मानसिक आत्मविश्वास वाढावा यासाठी सतत प्रेरणा आणि सपोर्टही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
“यशासाठी सातत्यपूर्ण तयारी आणि योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे असते. विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुन्हा नव्या उमेदीने अभ्यासाला सुरुवात करावी,” असे आवाहन PAHEL Institute तर्फे करण्यात आले आहे. री-NEET तयारीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन संस्थेकडून करण्यात आले असून अधिक माहितीसाठी ९७६३००९१५६ व ९७६६९२४९०० या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

