Mahabreaking

[breaking_news]

Outstanding Performance :श्री सं. ल. शिंदे विद्यालयाची उत्कृष्ट कामगिरी; दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

Outstanding Performance : पातूर तालुक्यातील सस्ती येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री सं. ल. शिंदे विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल उत्कृष्ट लागला आहे.

Outstanding Performance

राहुल सोनोने

दिग्रस बुद्रुक : पातूर तालुक्यातील सस्ती येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री सं. ल. शिंदे विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल उत्कृष्ट लागला आहे.

यंदाच्या शैक्षणिक वर्षात विद्यालयाचा एकूण निकाल ९२.३० टक्के लागला असून परीक्षेला एकूण ७८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २२ विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला आहे.

विद्यालयातून पिंपळखुटा येथील ऋषिकेश सोळंके याने ९०.८० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. समृद्धी काळपांडे हिने ८५.६० टक्के गुणांसह द्वितीय, श्रेया तांबडे हिने ८५.२० टक्के गुणांसह तृतीय, ऋतुजा लासुरकर हिने ८४.८० टक्के गुणांसह चतुर्थ, तर श्रीली बाजारे हिने ८३.४० टक्के गुण मिळवत पाचवा क्रमांक मिळविला. विद्यालयातील विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रासह विविध स्पर्धा व क्रीडा क्षेत्रातही सातत्याने उल्लेखनीय यश संपादन करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष गिरीश शिंदे, उपाध्यक्ष डॉ. संतोष पाठक, सचिव मोहन बदरखे, कोषाध्यक्ष अरविंद शेळके, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक सुभाष पातोंड, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन करून कौतुक केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top