Outstanding performance : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी व सातवीच्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा-२०२६ चा अंतिम निकाल २४ जुलै रोजी जाहीर झाला. या निकालात पातूर येथील सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेच्या १३ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरत उल्लेखनीय यश संपादन केले. या यशामुळे शाळेने आपल्या गुणवत्तेची परंपरा पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेत पातूरची यशस्वी भरारी; सातत्यपूर्ण गुणवत्तेची परंपरा कायम
पातूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी व सातवीच्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा-२०२६ चा अंतिम निकाल २४ जुलै रोजी जाहीर झाला. या निकालात पातूर येथील सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेच्या १३ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरत उल्लेखनीय यश संपादन केले. या यशामुळे शाळेने आपल्या गुणवत्तेची परंपरा पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
निकालानुसार इयत्ता चौथीमधून रुद्र खापरकर व कु. परिधी रोम यांनी, तर इयत्ता सातवीमधून समृद्धी गोळे, वेदिका गरजे, वैभवी घोंगे, लावण्या जाधव, श्रावणी नाभरे, ऋतुजा शेंडे, खुशी गाडगे, रेणू सावंत, प्रथमेश इंगळे आणि हर्षल महल्ले यांनी शिष्यवृत्तीसाठी पात्रता मिळविली. तसेच इयत्ता आठवीतील कु. स्वरा राखोंडे हिनेही आपल्या उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या बळावर हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे शाळेसह पालकांचाही गौरव वाढला असून, विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे प्रभावी मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि प्रशिक्षकांचे मोलाचे योगदान लाभल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्थेच्या अध्यक्षा सौ. सपनाताई म्हैसणे, संस्थेचे सचिव सचिन ढोणे, मुख्याध्यापक जे. डी. कंकाळ, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच आपल्या आई-वडिलांना दिले.

