Mahabreaking

🔴 BREAKING
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर

One person died : डोणगाव येथे थंडीमुळे गारठून एकाचा मृत्यू

One person died : डोणगाव येथील वाटीका हॉटेलजवळ एका व्यक्तीचा थंडीमुळे गारठून मृत्यू झाल्याची घटना दि. १३ डिसेंबर रोजी उघडकीस आली आहे.

person died

डोणगाव : डोणगाव येथील वाटीका हॉटेलजवळ एका व्यक्तीचा थंडीमुळे गारठून मृत्यू झाल्याची घटना दि. १३ डिसेंबर रोजी उघडकीस आली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हकिकत अशी की हॉटेल वाटीकाजवळ दि. १०/१२/२०२५ रोजी मृतक नामे रामकिसन ज्ञानुजी कांबळे (वय ४९, रा. रेगाव, ता. मालेगाव, जि. वाशिम) यांनी अतिसार मद्यप्राशन केल्याने ते हॉटेलजवळ पडून होते. दि. ११/१२/२०२५ रोजी सायंकाळी ६ वाजण्यापूर्वी ते त्याच ठिकाणी रात्रभर थंडीत पडून राहिल्याने, तसेच दारूचे प्रमाण अधिक असल्याने थंडीमुळे त्यांची प्रकृती बिघडली. यानंतर दि. ११/१२/२०२५ रोजी सकाळी त्यांना ग्रामीण रुग्णालय, मेहकर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी फिर्यादी योगेश भास्कर कांबळे (वय ३०, व्यवसाय मजुरी, रा. डोणगाव) यांच्या रिपोर्टवरून मर्ग दाखल करण्यात आला असून, मा. ठाणेदार यांच्या आदेशानुसार पुढील तपास से. फौ. खडसे यांच्याकडे देण्यात आला आहे. दरम्यान, डोणगाव येथे सध्या अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढले असून राज्य महामार्गावरील हॉटेलांमध्ये जेवणासोबत दारू उपलब्ध करून दिली जात आहे. त्याचबरोबर रात्री नियमबाह्य पद्धतीने हॉटेल सुरू असतात. याकडे स्थानिक पोलीस दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारीही याकडे फिरकत नसल्याने डोणगाव येथे दारू विक्रीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे युवा वर्ग नशेकडे वळताना दिसून येत असून, पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे नशामुक्त अभियान केवळ कागदावरच असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top