Mahabreaking

🔴 BREAKING
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर

Shri Tejaswi Baba : लाखो भाविकांच्या उपस्थितीत परमहंस श्री तेजस्वी बाबा मंत्रोच्चारात समाधीस्त

Shri Tejaswi Baba : सिंदखेडराजा तालुक्यातील तीर्थक्षेत्र वरोडी येथील परमहंस श्री तेजस्वी महाराज यांचा समाधी सोहळा लाखो भाविक भक्तांच्या उपस्थितीत आज, १४ डिसेंबर रोजी, अत्यंत दु:खद वातावरणात पार पडला. उपस्थित गुरुवर्यांनी मंत्रोच्चार केले. हा सोहळा पाहताना सर्वांच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते.

Shri Tejaswi Baba
परमहंस श्री तेजस्वी महाराजांच्या जयजयकाराने वरोडी दुमदुमली; 
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासह अनेकांची उपस्थिती

साखरखेर्डा : सिंदखेडराजा तालुक्यातील तीर्थक्षेत्र वरोडी येथील परमहंस श्री तेजस्वी महाराज यांचा समाधी सोहळा लाखो भाविक भक्तांच्या उपस्थितीत आज, १४ डिसेंबर रोजी, अत्यंत दु:खद वातावरणात पार पडला. उपस्थित गुरुवर्यांनी मंत्रोच्चार केले. हा सोहळा पाहताना सर्वांच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते.

काल, १३ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वाजता परमहंस श्री तेजस्वी महाराज यांचे वैकुंठगमन झाले. ही वार्ता वाऱ्यासारखी संपूर्ण बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, वाशिम व जळगाव भागात पसरताच रात्रीपासूनच भक्तांचा महासागर वरोडीत दाखल होऊ लागला. रात्रीपासून दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली होती. ही गर्दी आज दुपारी एक वाजेपर्यंत कायम होती.

लाखो भाविक रांगेत दर्शनासाठी उभे असताना अखेर दुपारी १ वाजता श्री श्री श्री १००८ हरिचैतन्य स्वामी महाराज, साखरखेर्डा येथील श्री पलसिद्ध महास्वामी मठाचे मठाधिपती सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह. भ. प. प्रकाश महाराज जंजाळ, सोपान महाराज गव्हाड, अमोलनंद स्वामी, प्रेमानंद महाराज देशमुख, निवृत्ती महाराज व ओम महाराज यांच्या मंत्रोच्चारात मंदिरात समाधी सोहळा पार पडला.

या अगोदर संस्थानच्या वतीने परमहंस श्री तेजस्वी महाराज यांना स्नान घालण्यात आले. यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, संस्थानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण गारोळे, अध्यक्ष श्यामसुंदर जाजू, महाराजांचे धाकटे बंधू माजी सरपंच जनार्दन गुंजकर, विश्वस्त काशिनाथ गारोळे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल तुपकर, माजी सभापती ह. भ. प. जगनमामा सहाने यांनी अंतिम दर्शन घेतले.

आज शेकडो वारकरी दिंड्या दाखल झाल्या होत्या. सर्वांच्या मुखातून “जय जय रामकृष्ण हरी” हा एकच नामस्मरणाचा जयघोष सुरू होता. समाधी सोहळा डोळ्यांत पाणी आणणारा असला तरी अंतिम दर्शन व्हावे, अशी सर्वांचीच इच्छा होती. परंतु वेळेअभावी हजारो भाविकांनी समाधीवर डोके ठेवून आपल्या गुरुंबद्दलची कृतज्ञता पाणावलेल्या डोळ्यांतून अश्रू ढाळत व्यक्त केली.यावेळी माजी मंत्री डॉ. शशिकांत खेडेकर यांच्यासह सर्वच गुरुवर्यांनी आपली श्रद्धांजली अर्पण केली.

Shri Tejaswi Baba

आचार, विचार आणि संस्कार देणारे तीर्थक्षेत्र

— केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव

वरोडी हे संस्थान आचार, विचार आणि संस्कृती देणारे तीर्थक्षेत्र असून परमहंस श्री तेजस्वी महाराज आज आपल्यात नसले तरी ते कीर्तीच्या रूपाने याच ठिकाणी आहेत. आजपर्यंत महाराजांनी माझ्यासह सर्वांच्या पाठीवर हात ठेवून आपले जीवन सुखकर केले आहे. त्यांच्या आशीर्वादाची शिदोरी नेहमी माझ्या स्मरणात राहील, अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

जोपर्यंत चंद्र, सूर्य, तारे आहेत, तोपर्यंत महाराज श्रींचे नाव राहील

— माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

परमहंस श्री तेजस्वी महाराज ही साधीसुधी व्यक्ती नव्हती, तर जन्मापासूनच त्यांच्या अंगी विभूती होती. आजपर्यंत लाखो भाविक भक्त त्यांचे अनुयायी झाले आहेत. त्यांच्या दिव्य, चमत्कारिक प्रभावामुळे अनेकांना अनुभूतीसुद्धा आली आहे. त्यामुळे आज त्यांनी देह ठेवला असला तरी ते या परिसरात वास करून वास्तव्यास आहेत. जोपर्यंत चंद्र, सूर्य, तारे आहेत, तोपर्यंत परमहंस श्री तेजस्वी बाबांचे नाव अजरामर राहील, अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top