MLA Shwetatai Mahale :उन्हाळ्यात कोणत्याही गावात मुबलक पाणी उपलब्ध झाले पाहीजे, तसेच पाणीटंचाई संदर्भात गय करण्यात येणार नाही. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेले कामे अर्धवट कामे पूर्ण करा, देयके थकले म्हणून पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडीत करू नये, असे निर्देश चिखली विधानसभा मतदार संघांच्या आमदार श्वेताताई महाले यांनी दिले. धाड येथे 1 एप्रिल रोजी देशमुख टॉवर येथे पाणीटंचाई आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.

पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडीत न करण्याचे आदेश; धाड येथे पाणीटंचाई आढावा बैठक
बबन फेपाळे
रुईखेड मायंबा : उन्हाळ्यात कोणत्याही गावात मुबलक पाणी उपलब्ध झाले पाहीजे, तसेच पाणीटंचाई संदर्भात गय करण्यात येणार नाही. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेले कामे अर्धवट कामे पूर्ण करा, देयके थकले म्हणून पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडीत करू नये, असे निर्देश चिखली विधानसभा मतदार संघांच्या आमदार श्वेताताई महाले यांनी दिले. धाड येथे 1 एप्रिल रोजी देशमुख टॉवर येथे पाणीटंचाई आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.
बुलढाणा तालुक्यातील 34 गावे चिखली विधानसभा मतदार संघात येतात. या गावातील पाणीटंचाईवर धाड येथे आढावा सभा घेण्यात आली. या आढावा सभेच्या अध्यक्षस्थानी चिखली विधानसभेचे आमदार श्वेताताई महाले पाटील होत्या. या सभेत मार्गदर्शन करताना आ. महाले यांनी पाणीटंचाई संदर्भात कुणाचीही गय केली नसल्याचे यावेळी सांगितले. तसेच प्रत्येक गावाला मुबलक पाणी उपलब्ध झाले पाहीजे. प्रत्येक गावातील सरपंच, सचिवांकडून जलजीवन मिशन योजनांची माहिती घेतली असता अनेक गावातील योजना अर्धवट असल्याचे समोर आले. यापूर्वी निधी नसल्याने या योजनांचे कामे ठप्प झाली होती. मात्र, आता केंद्र शासनाने या योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे, आता या योजनांची कामे तातडीने पूर्ण होतील असे आमदार महाले यांनी सांगितले.
यावेळी काही सरपंचांनी पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात येत असल्याचे आमदार महाले यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर ताईंनी लगेच महावितरणचे उपअभियंता राजेश कायंदे यांना सक्त ताकीद दिली की,कुठेही पाणीपुरवठ्याची वीज कनेक्शन तोडल्यास तुमची ही गाय केली जाणार नाही.त्यामुळे प्रत्येक गावांना करडी धरणावरून होत असलेला पाणीपुरवठा सुरळीत सुरू व्हावा असे सांगितले.
या सभेला गटविकास अधिकारी अमिता पवार नायब तहसीलदार पाटील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी किरण पाटील जल जीवन पाणीपुरवठा अधिकारी नितीन घुसळकर, शुभम बारोटे ,सतीश इंगळे, वीज वितरण कंपनी उपअभियंता राजेश कायंदे ,विस्ताराधिकारी टेकाळे ,गवते ,भाजपाचे उपजिल्हाध्यक्ष देविदास पाटील जाधव ,सुनील देशमुख, उपजिल्हाप्रमुख निलेश गुजर ,प्रदीप टाकसाळ ,निलेश देठे , किशोर साखरे ,अमोल शिंदे , अनिल जाधव ,श्रीरग ऐडोले, विष्णू वाघ, योगेश राजपूत, अनिल फेपाळे, किरण सरोदे,विशाल विसपुते ,गणेशबाजी बबलू वाघुर्डे, अनिल कुटे ,डिगाबर जाधव ,विष्णू उगले आदींसह इतर उपस्थित होते.

