Mahabreaking

[breaking_news]

Shiv Gorakh Dham: शिव गोरक धामला विकासाची नवी दिशा; रस्ता आणि 25 HP डीपीसह विविध कामांचे भूमिपूजन

Shiv Gorakh Dham: चिखली–जालना हायवेवरून शिव गोरक धामकडे जाणाऱ्या नव्या रस्त्याचे आणि लाईट सुविधा (डीपी) बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन दत्त जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात पार पडले. हे भूमिपूजन आमदार मनोज कायंदे यांचे मोठे बंधू सतीश कायंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

Shiv Gorakh Dham

गजानन भालेकर 

धोत्रा नंदाई  : चिखली–जालना हायवेवरून शिव गोरक धामकडे जाणाऱ्या नव्या रस्त्याचे आणि लाईट सुविधा (डीपी) बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन दत्त जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात पार पडले. हे भूमिपूजन आमदार मनोज कायंदे यांचे मोठे बंधू सतीश कायंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

शिव गोरक धामसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत रस्ता मंजूर झाला असून त्या अंतर्गत 25 हाऊस पॉवर क्षमता असलेली डीपी बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिसरातील पाणीटंचाई लक्षात घेता बोरवेल उपलब्ध करून देण्याचे आश्वासन तसेच धामच्या सुरक्षिततेसाठी चारही बाजूंनी तारफेन्सिंग (कंपाउंड) करण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.

या कामांमुळे शिव गोरक धाम परिसराचा विकास वेगाने होण्यास मदत होणार असून भाविक आणि ग्रामस्थांची दीर्घकालीन मागणी पूर्ण होत असल्याचे उपस्थितांनी सांगितले. कार्यक्रमास माजी जिल्हा सदस्य भगवान मुंडे, सरपंच विष्णू गीते, प्रदीप जयहाई, शरद नागरे, अक्षय ठाकरे, भुजंगराव काकड, राजेंद्र शिंगणे, संजय आंधळे, सरपंच संजय परिहार तसेच मोठ्या संख्येने भाविक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.समाजहितासाठी घेतलेला हा निर्णय परिसराच्या मूलभूत विकासाला गती देणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top