Mahabreaking

[breaking_news]

Cattle trapped : ट्रकमध्ये कोंबून गुरांची वाहतुक, २७ गुरांची सुटका

Cattle trapped : ट्रकमध्ये कोंबून नेण्यात येत असलेल्या म्हशी व रेडे अशा २७ जनावरांची सुटका पोलीस मित्र आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली. या प्रकरणी ट्रकचालकासह तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आले असून जनावरांना गोशाळेत पाठविण्यात आले आहे.

Cattle trapped

पोलीस मित्र व बजरंग दलाने घेतला पुढाकार : तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

मेहकर : ट्रकमध्ये कोंबून नेण्यात येत असलेल्या म्हशी व रेडे अशा २७ जनावरांची सुटका पोलीस मित्र आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली. या प्रकरणी ट्रकचालकासह तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आले असून जनावरांना गोशाळेत पाठविण्यात आले आहे.

जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीत १ डिसेंबर रोजी दुपारी १६ टायरच्या ट्रक (क्रमांक एमपी-५१-झेडए-८८१६) मधून म्हशी व रेड्यांची अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. नायगाव दत्तापूर येथून जानेफळकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या या ट्रकमधून गुरांचा हंबरडा ऐकू आल्याने संशय निर्माण झाला. ही जनावरे कत्तलीसाठी नेली जात असल्याचे लक्षात येताच जानेफळ व देऊळगाव साकर्शा येथील पोलीस मित्र व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ट्रक अडविला.

ट्रकमध्ये कोंबून भरल्यामुळे जनावरांचा श्वास गुदमरत होता तसेच काही जनावरे जखमी झाली होती. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार आजिनाथ मोरे यांनी पंचनामा करून जखमी गुरांवर उपचाराची व्यवस्था केली. पश्चात ही सर्व जनावरे मेहकर तालुक्यातील विश्वी येथील संत सेवालाल महाराज गो-रक्षण संस्थेत रवानगी करण्यात आली.

एकूण २७ म्हशी व रेडे मध्य प्रदेशातून खामगाव येथील व्यापाऱ्याकडे नेण्यात येत होते, अशी माहिती समोर आली आहे. ट्रकचालक आणि गाडीत उपस्थित तिघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी जानेफळ पोलिसांनी इश्तियाक अहमद मोहम्मद इब्राहीम  रा. सटटी ता. भोगनीपुर जि. कानपुर , सैजाद नवाब कुरेशी  रा. डिटोरी ता. नैनीताल जि. मंडळा , बस्सी अहमद मसिम अहमद रा .बराव ता. भोगनीपुर जि. कानपुर यांच्याविरुध्द कलम 281 बि एन एस 2023 सह कलम 185 मोवाका सह कलम 11. (1) (d) (6) (1) प्राण्यांना क्रुरतेने वागविणे बाबत अधिनियम 1980 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जानेफळ पोलीस करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top