Mahabreaking

[breaking_news]

National Pulse Polio :बोराखेडीत राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा उत्साहात शुभारंभ; ९१.४९ टक्के बालकांना डोस

National Pulse Polio : प्राथमिक आरोग्य केंद्र बोराखेडी अंतर्गत राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजित मंडाले व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निलेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक थिगळे यांच्या हस्ते पाच वर्षांखालील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून मोहिमेची सुरुवात करण्यात आली.

National Pulse Polio
‘दोन थेंब जीवनाचे’ संदेशाला प्रतिसाद; बोराखेडी आरोग्य केंद्रात ५,२६४ बालकांचे लसीकरण

मोताळा : प्राथमिक आरोग्य केंद्र बोराखेडी अंतर्गत राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजित मंडाले व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निलेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक थिगळे यांच्या हस्ते पाच वर्षांखालील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
या मोहिमेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र बोराखेडीच्या कार्यक्षेत्रात ५,७०१ बालकांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी ० ते ५ वर्षांखालील ५,२१६ बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देण्यात आला. याशिवाय ५ वर्षांवरील ४८ लाभार्थ्यांनाही डोस देण्यात आला. अशा प्रकारे एकूण ५,२६४ लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले असून, मोहिमेची ९१.४९ टक्के उद्दिष्टपूर्ती करण्यात आली आहे.
मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ५५ लसीकरण बूथ, ८ मोबाईल पथके तसेच मोताळा बसस्टॉप आणि वाघजाळ फाटा येथे २ ट्रान्झिट पथके कार्यरत होती. एकूण ६५ पथकांनी समन्वयाने काम करत लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबविली. आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि स्वयंसेवकांनी घरोघरी जनजागृती करत पालकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित केले.
यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने सर्व पालकांना आवाहन करण्यात आले की, ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजावेत आणि कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. “दोन थेंब जीवनाचे” हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवून पोलिओमुक्त भारत घडविण्याचा संकल्प अधिक बळकट करण्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

दरम्यान, अद्याप लसीकरणापासून वंचित राहिलेल्या पात्र बालकांपर्यंत पोलिओ प्रतिबंधक डोस पोहोचविण्यासाठी आरोग्य विभागाकडून विशेष प्रयत्न सुरू असून, सर्व पालकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन बोराखेडी येथील वैद्यकीय अधिकारी विवेक थिगळे यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top