Mahabreaking

[breaking_news]

truck catches fire : राष्ट्रीय महामार्गावर धावत्या मालवाहू ट्रकचा भडका; वाहनासह साहित्य जळून खाक!

truck catches fire : राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत, बोरगाव मंजूनजीक धावत्या मालवाहू ट्रकला अचानक आग लागल्याची घटना १० ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या आगीत ट्रक आणि त्यातील साहित्य जळून खाक झाले. दरम्यान, चालकाच्या प्रसंगावधानामुळे चालक आणि वाहक या दोघांनीही वेळीच ट्रकमधून बाहेर पडत स्वतःचा जीव वाचविला.

truck

 बोरगाव मंजूनजीक महामार्गावर आगीचे तांडव; चालक-वाहक प्रसंगावधानाने बचावले

बोरगाव मंजू : राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत, बोरगाव मंजूनजीक धावत्या मालवाहू ट्रकला अचानक आग लागल्याची घटना १० ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या आगीत ट्रक आणि त्यातील साहित्य जळून खाक झाले. दरम्यान, चालकाच्या प्रसंगावधानामुळे चालक आणि वाहक या दोघांनीही वेळीच ट्रकमधून बाहेर पडत स्वतःचा जीव वाचविला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोल्याकडून अमरावतीच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रकने बोरगाव मंजूनजीक राष्ट्रीय महामार्गावर अचानक पेट घेतला. ट्रकला आग लागल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्याने प्रसंगावधान राखून वाहन थांबविले. त्यानंतर चालक आणि वाहक दोघेही तातडीने ट्रकमधून बाहेर पडले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. आगीच्या तीव्रतेमुळे ट्रक आणि त्यातील साहित्य जळून खाक झाले. महामार्गावर धावत्या ट्रकला आग लागल्याची माहिती मिळताच बोरगाव मंजूचे ठाणेदार सुनील वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल महादेव पातोंड, नारायण शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, महामार्गावर ट्रकला आग लागल्याने काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला आणि वाहतूक विस्कळीत झाली. ट्रकला आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या घटनेचा पुढील तपास ठाणेदार सुनील वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगाव मंजू पोलीस करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top