Mahabreaking

🔴 BREAKING
Bhim Jayanti :साखरखेर्डा नगरीत भीमजयंतीचा उत्साह;  लेझीम , टिपरी नृत्याने वेधले लक्ष Two Houses Burglarized :गंगानगरमध्ये चोरट्यांचा हैदोस, दोन घरे फोडली; सोने,चांदीची दागिणे केले लंपास The Bell Rings Again :17 वर्षांनी पुन्हा घंटा वाजली; दीनदयाल महाविद्याल;यात माजी विद्यार्थ्यांचा भावनिक ‘गेट टुगेदर’ Neminath Maharaj Saptah :ब्राह्मण चिकना येथे नेमिनाथ महाराज सप्ताहाची महाप्रसादाने सांगता Complaints of solar agricultural pump :सौर कृषी पंपधारकांच्या तक्रारींचा होणार जागेवरच निपटारा Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Bhim Jayanti :साखरखेर्डा नगरीत भीमजयंतीचा उत्साह;  लेझीम , टिपरी नृत्याने वेधले लक्ष Two Houses Burglarized :गंगानगरमध्ये चोरट्यांचा हैदोस, दोन घरे फोडली; सोने,चांदीची दागिणे केले लंपास The Bell Rings Again :17 वर्षांनी पुन्हा घंटा वाजली; दीनदयाल महाविद्याल;यात माजी विद्यार्थ्यांचा भावनिक ‘गेट टुगेदर’ Neminath Maharaj Saptah :ब्राह्मण चिकना येथे नेमिनाथ महाराज सप्ताहाची महाप्रसादाने सांगता Complaints of solar agricultural pump :सौर कृषी पंपधारकांच्या तक्रारींचा होणार जागेवरच निपटारा Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

MLA Manoj Kayande  :देऊळगाव राजाच्या विकासासाठी आमदार मनोज कायंदे सरसावले

MLA Manoj Kayande  : स्थानिक विकासकामांना वेग देण्याच्या भूमिकेतून आमदार मनोज कायंदे यांनी देऊळगाव राजा शहरात प्रस्तावित ३३/११ के.व्ही. वीज उपकेंद्र तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहासाठी जागेची पाहणी करत प्रशासनाला तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले. या उपक्रमांमुळे शहरासह ग्रामीण परिसरातील पायाभूत सुविधा मजबूत होऊन नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

MLA Manoj Kayande 

वीज उपकेंद्र व शासकीय वसतिगृह प्रकल्पांना मिळणार गती गती, नियोजित जागांची केली पाहणी

गजानन तिडके 

देऊळगाव राजा :स्थानिक विकासकामांना वेग देण्याच्या भूमिकेतून आमदार मनोज कायंदे यांनी देऊळगाव राजा शहरात प्रस्तावित ३३/११ के.व्ही. वीज उपकेंद्र तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहासाठी जागेची पाहणी करत प्रशासनाला तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले. या उपक्रमांमुळे शहरासह ग्रामीण परिसरातील पायाभूत सुविधा मजबूत होऊन नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमार्फत उभारण्यात येणाऱ्या नवीन ३३/११ के.व्ही. वीज उपकेंद्रासाठी शहराजवळील खोलेश्वर महादेव मंदिर परिसरात प्रत्यक्ष जागेची पाहणी करण्यात आली. वाढत्या वीज मागणीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार असून वीजपुरवठा अधिक सक्षम व अखंडित करण्यासाठी आवश्यक पावले उचलली जाणार असल्याचे संकेत यावेळी देण्यात आले.
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहाच्या उभारणीसाठी प्रस्तावित जागेची पाहणी करून विद्यार्थ्यांना दर्जेदार निवास सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार आमदार कायंदे यांनी व्यक्त केला. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संधी वाढविण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे.
या पाहणीवेळी विभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, महावितरणचे उपविभागीय अभियंता संदीप शेटे, मंडळ अधिकारी रामदास मांटे तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
देऊळगाव राजा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देत आगामी काळात आणखी विकासकामांना गती दिली जाईल, असा विश्वास स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top